मलेशियात "पेमांडू' प्रकल्पाने परिवर्तन घडविले. ' पेमांडू ' मुळं मलेशिया झोतात आलं आहे.
विकास करण्यासाठी मलेशियातली "पेमांडू' पद्धत खूप उपयोगी पडेल. "पेमांडू'चे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे, लोकांना विचारून विकासासाठी कशाला प्राधान्य द्यायचं, हे ठरवायचं व त्यानुसार प्रकल्पांची "ब्लू प्रिंट' तयार करायची. दुसरा भाग म्हणजे, सार्वजनिक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी दर आठवड्याला किती प्रगती झाली, हे जाहीर करायचं. हे असं केलं तर लोकांचा राज्यसत्तेवर अंकुश राहतो.
पेमांडू या विकास प्रकल्पांची अंमलबजावणी, सर्वांगीण विकास सर्व स्तरांपर्यंत पोचविणे, सरकारचा रूपांतरण कार्यक्रम व आर्थिक परिवर्तन कार्यक्रमाला पाठिंबा देणे व विकास घडविणे हे "पेमांडू'चे उद्दिष्ट होते. विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणाऱ्या तज्ज्ञांना आणि अगदी सामान्यातल्या सामान्य मलेशियन नागरिकालाही त्यांच्या या परिवर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले.
पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा विचार करता जगातील कोणत्याही सरकारने प्रशासन आणि नागरिकांतील दुवा होत राबविलेली ही सर्वांत अभिनव योजना ठरावी.
मलेशियात परिवर्तन घडविणाऱ्या "पेमांडू' प्रकल्पाची राज्याच्या विकासासाठी मदत घेत आहोत. त्याचाही आपल्याला नक्कीच उपयोग होईल. राजकारणी, सनदी अधिकाऱ्यांसह विकास करण्याच्या इच्छाशक्तीने सारे एकत्र आलो, तर चांगली प्रगती होऊ शकते. त्यासाठी जनतेने आपले सारे प्रश्न तातडीने सुटले पाहिजेत, अशी मानसिकता न ठेवता थोडा संयमही बाळगण्याची गरज आहे. एखादी समस्या सोडविताना समाजाच्या व्यापक भल्यासाठी काही जणांनी आपले आग्रह थोडे बाजूला ठेवायला हरकत नाही. अशा वेळी इतरांनी धीर धरून आपलीही समस्या सुटेल, हा विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येकाची अशी मानसिकता तयार झाल्यास येत्या तीन ते पाच वर्षांत परिवर्तन दिसून येईल. फक्त त्यासाठी संयम ठेवून प्रत्येकाने व्यक्तिगत स्वार्थापलीकडे समाजहिताला प्राधान्य देण्याची गरज आहे.
अचंबित करणाऱ्या परिवर्तनाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जागतिक बॅंकेसह हार्वर्ड, प्रिस्टन, एटी कार्नी यांसारख्या जागतिक महत्त्वाच्या संस्थांनी व जपान, दक्षिण कोरिया, टांझानिया, रशिया आदी चौदा देशांनी "पेमांडू'ला मान्यता दिली आहे. बदल घडवण्याची इच्छाशक्ती व प्रभावी अंमलबजावणी करीत एखादा देश किती प्रगती साधू शकतो, याचे मलेशिया हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
विकास हवा असेल तर शास्त्रीय पद्धतीनं प्रकल्पांची तयारी करणं व त्यांची अंमलबजावणी; तसंच प्रगती नियमितपणे जनतेसमोर आणणं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी "पेमांडू'चे कौतुक केलं आहे; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य! दिल्लीत आता "आप'ला सत्ता मिळाली आहे. त्या पक्षानं "पेमांडू' पद्धतीचा वापर केला, तर सर्व प्रकल्प वेळवेर उभे राहतील व आर्थिक पद्धतीला वेग येईल.
मलेशियात परिवर्तन घडविणाऱ्या "पेमांडू' प्रकल्पाची राज्याच्या विकासासाठी मदत घेत आहोत. त्याचाही आपल्याला नक्कीच उपयोग होईल. राजकारणी, सनदी अधिकाऱ्यांसह विकास करण्याच्या इच्छाशक्तीने सारे एकत्र आलो, तर चांगली प्रगती होऊ शकते
आपल्या देशात विकास पाहायचा असेल तर या अभिनव योजनेची अंमलबजावणी व्यवस्तथित झाली पाहिजे.
No comments:
Post a Comment