आजची तरुणपीढी संतती पासुन दुर राहण्याचा निर्णय घेत आहे. मूल नसेल तर काळजीच नाही. बंधनरहित मुक्त आयुष्य जगतात येईल. मस्त मजा करता येइल.मुलांच्या जबाबदाऱ्या नसल्याने आपलंच आयुष्य आपण अधिक अर्थपूर्ण जगू शकू. आपला वेळ फक्त आपला असेल , आपली एनर्जी फक्त स्वतःसाठीच वापरता येईल,असं तरुणांचे म्हणणे आहे.त्यामुळेच करिअर आणि वैयक्तिक आयुष्य ही कसरत करताना अजून एक जबाबदारी पेलण्याची त्यांची तयारी नाही.असा विचार वाढत असल्याने ' चाइल्ड फ्री ' राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काहीजणांनी आजच्या ' आर्थिक ' परिस्थितीचा विचार केल्याने अनेक जोडप्यांचे मन नव्या जबाबदारीसाठी तयार नाही. भारतीय तरुण जोडप्यांमध्ये परदेशीयांप्रमाणे 'चाइल्ड फ्री' राहण्याचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. ‘नर्स द बेबी व प्रोटेक्ट द चाइल्ड’ यापासून लांब राहण्याचा त्यांचा बेत दिसतो आहे.
मुल झालं की त्याच्या जन्मापासून ते संपूर्ण आयुष्य घडवण्यापर्यंत ते आपलं आयुष्य व्यापून टाकतं. त्याच्या बरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या , त्यांचे दडपण हा भागहि आलाच. मुलांचे संगोपन , शिक्षण , करिअरच्या वाटा आणि लग्न... आपल्या सामाजिक ढाच्यात येणाऱ्या या सगळ्या जबाबदाऱ्या पेलणं हे खरोखरच दिव्य वाटू लागतं. त्यातच आपल्या आईवडिलांची , भोवतालच्यांची होत असलेली कसरत , तारांबळ हे सारं डोळ्यासमोर असताना त्याच दिशेने आपण का जावं , हा प्रश्न कुठेतरी या जोडप्यांच्या मनात मूळ धरू लागला आहे.केवळ मजेसाठी मुलांचे संगोपण ,वाढवणे,मोठे करणे यापासून दूर राहण्याचा मार्ग स्विकारल्याने मुलचं न होऊ देणे वा शरीरसुखाची मजा लुटण्य़ासाठी एकत्र राहणे वा लिव इन रिलेशनशिप ठेवणे इथपर्यत यांची मजल गेली आहे. समाज बदलतो आहे याची नोंद घेतली गेली पाहिजे.

आजच्या करिअरच्या व स्पर्धेच्या युगात रोज नवी आव्हाने उभी ठाकतात. त्यामुळेच शिक्षण, आवडनिवड, करिअर या पातळ्यांवर मी तडजोड का करावी? मोठ्या कष्टाने स्वतःला सिद्ध केलेले असताना,ते अर्ध्यावर का टाकावे? ह्या विचाराला ही जोडपी महत्व देत आहेत. ' चाइल्ड फ्री ' राहिलो तर आपले करिअर आपल्याला पाहिजे तसे करता येइल हे त्याना वाटत आहे.मूल हवं की नको , हवं तर कधी हवं , या साऱ्याचाच खूप सारासार विचार करण्याची क्षमता आजच्या तरुणांमध्ये दिसते. तरुणपणी ज्या मुलांना "म्हातारपणाची काठी' समजून जन्मास घातले व वाढविले, ती "काठी'च जर म्हातारपणी हाताशी येत नसेल तर... ही मुलं कशाला पाहिजेत?
सध्याच्या राहाणीमनाचा फाजील बाऊ कारून स्वत:च्या ऐश आरामी जीवनासाठी मातृत्व कायमचे टाळणे ही घोर घोडचुक होऊ शकते.
पालकत्व हे बंधन नाही तर निवडच आहे. ही बाब ठामपणे सांगून ' चाइल्ड फ्री ' राहण्याचा पर्याय ते स्वीकारतात.हे त्यांच्यासाठी योग्य पण समाजासाठी अयोग्य वाटत आहे.
मूल म्हणजे आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता असते. मुलाशिवाय घराला घरपण येत नाही. थोडक्यात आपले जीवन आपल्या मुलाबाळांवर पूर्णपणे केंद्रीत असते.
समोरील आव्हाने , करिअर यामध्ये स्थिरावल्यानंतर हा निर्णय डळमळीत झाला तर मानसिक कुचंबणाही होऊ शकते.मग इतर पर्यायांचा विचार केला जातो.
एकीकडे मुलं हवीत म्हणून वाट्टेल ते करायला तयार असलेला वर्ग आहे आणि दुसरीकडे आपली मुलं बेस्ट असायला हवीत म्हणून त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करणारा वर्गही आहेच.आता नवीन वर्ग उदयास येत आहे ' चाइल्ड फ्री '.
' चाइल्ड फ्री ' सारखा वेगळा निर्णय समाजमनाने स्वीकाराला वेळ लागणारच आहे.वेगात बदलणा-या या नव्या विचारसरणी पुढे लवकर स्विकारावा लागेल असे दिसत आहे.
तसेच तरुणांच्या या निर्णयाकडेही ' प्रश्न ' वगैरे ठरवून नकारात्मकतेने पाहण्यापेक्षा सकारात्मक बदल , विचार म्हणून बघता येईलच की... त्यासाठी आवश्यकता आहे, समाजानेही स्वतःला वेगळी दृष्टी देण्याची.
जुन्या पिढीतील व्यक्तींनी नवीन पिढीतल्या व्यक्तींवर आपल्या जुन्याच गोष्टी, पद्धती, आचारविचार लादणे योग्य नव्हे. नवीन पिढीतल्या नव्या संकल्पना जुन्या पिढीने लक्षात घ्यायला हव्यात.
No comments:
Post a Comment