Friday, February 21, 2014

पीडित



  पीडित हा शब्द हल्ली सारखा वाचण्यात येत आहे.पीडीतांच्याच बातम्या जास्त असतात. तसा हा शब्द वाईट आहे. हा महा भंयकर शब्द शरीराला चकटला की त्याच्या पासून सुटका नाही.ज्याच्या पाठीमागे लागतो.त्याला खुप त्रास करावा लागतो.ज्या व्यक्ती वर अत्याचार होतो  त्या व्यक्तीला पीडित समजले जाते.बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या भीषण प्रसंगाला सामोरं जावं लागलेल्या दुर्देवी महिलांना नत‍ंर पीडीत म्हणून संबोधले जाते.या पार्श्वभूमीवर पीडित महिलेला वैद्यकीय उपचार आणि समुपदेशाकची गरज असते.ते त्याना त्या काळात मिळत नाही.

अत्याचार झाल्यावर ती व्यक्ती पीडीत होते.ती स्वत:हून पीडीत होण्यासाठी जात नाही तरी देखील आपला समाज अशा व्यक्तीना मान सन्मान न देता वाळीत टाकल्याची वागणुक देते.पीडीत कोणत्याही ठरविक वयाचे नाहीत.ते वेगवेगळ्या वयातील आहेत.


काही नैसर्गिक आपत्तीमुळे पीडीत होतात.त्या‍चे पुनर्वसन झाले की ते यातून बाहेर येतात.पण अत्याचारानतंर जे पीडीत होतात त्याना बाहेर पडण्यास बराच कालावधी लागतो पण मनावर झालेली जखम काही भरुन येत नाही.

बलात्कारित पीडित अल्पवयीन मुलीची आत्महत्या, पीडित गरोदर महिलेला पोलिसांचा मार, सामूहिक बलात्कारातील पीडित तरुणीचे पार्थिव आणून शोकाकूल वातवरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, लैंगिक अत्याचाराची बळी पीडीत तरुणी  या अशा पीडित महिलांचे दु:ख, भीती आणि निराशा एक सारखीच आहे. 


या पीडीतांवर अत्याचार झाल्यावर  त्या बद्द्लच्या चौकशीला सामोरे जावे लागते.तेच  त्यांच्यासाठी मानहानीकारक असते.पीडीतांनी अत्याचार  सोसायचा व नतंरच्या चौकशाही सहन  करायचा.याच  त्रासाला कंटाळून या पीडीत आत्महत्या करतात.

असे म्हणतात, की खुनी इसम शरीर संपवतो; पण बलात्कारी पुरुष पीडित स्त्रीच्या आत्म्याचीच हत्या करतो. अशा अभागी स्त्रीला संपूर्ण आयुष्य कधी न भरून येणारे व्रण घेऊन जगायचे असते. मृत्यूपेक्षाही भयंकर असे दुःख घेऊन, पदोपदी अवहेलना सहन करत जीवन जगायचे असते. ज्या वेळी त्या संदर्भातील खटला चालतो त्या वेळी त्या महिलेला पुन्हा एकदा दुःखदायक अनुभवांना सामोरे जावे लागते. त्या वेळी आपणच गुन्हेगार आहोत की काय, अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनात निर्माण होते. किंबहुना तशी भावना तिच्या मनात निर्माण व्हावी याकरिता प्रयत्न होतात. अनेक वेळा या जीवघेण्या अनुभवांमुळे पालक, पीडित महिला तक्रार करायला पुढे येत नाही. सगळ्या यंत्रणा- ज्यात आरोपी, आरोपीचे वकील, पोलिस दल एकत्रितपणे काम करतात असे वाटावे अशी परिस्थिती आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेली न्याय यंत्रणा याकडे अत्यंत तटस्थपणाने पाहत असते.

आसाराम बापु, तहलकाचा माजी संपादक तरूण तेजपाल,सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्या. ए.के.गांगुली यांच्या अत्याचाराला अनेक पीडीत तरुणी बळी पडल्या आहेत. 

पीडितांविषयी दखल घेण्याची वेळ येते, तेव्हा फौजदारी न्यायप्रणाली गरजेपेक्षा जास्त संथ होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने याबाबत वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत, परंतु त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचार थांबविण्याचे किंवा कमी करण्याचे परिणामकारक उपाय मिळालेले नाहीत. 


बलात्कार, बालकांवरील लैगिंक अत्याचार, ॲसिड हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना गंभीर शिक्षा देणे आवश्यक असतांनाच या गुन्ह्यातील पीडित महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणे हे तितकेच आवश्यक आहे. पुन:स्थापक न्यायाच्या तत्वानुसार अशा महिला व बालकांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, वित्तीय सहाय्य देणे, तसेच समुपदेशन, निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत इत्यादी आधारसेवा तत्परतेने उपलब्ध करुन त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.


पीडित महिलांना अत्याचारानंतर त्वरित उपचार मिळत नाहीत.मिडिया यांच्या बातम्या बनवितात. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे मार्केटींग करीत  पैसे कमवतात.पण यांचे पीडितपण दूर करण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. 

 राष्ट्रीय महिला आयोगाने प्रत्येक वेळी राज्यातील महिलांच्या प्रश्‍नांमध्ये लक्ष घातले असले तरी, राज्य महिला आयोगाने पोलिसांवर दबाव आणून पीडीत महिलांना जलद गतीने योग्य न्याय मिळवून देण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे. 


 अत्याचारित, पीडित आणि परित्यक्ता महिलांसाठी केंद्र सरकारने नव्याने 'मनोधैर्य' योजना सुरू केली आहे.


पीडीतांच्या व्यथा भंयकर  आहेत त्या जाणुन घेणे गरजेचे आहे.त्यांना सावरायला मदत केली पाहिजे.

No comments: