Thursday, February 27, 2014

'मराठी भाषा दिन'

सर्वाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


 'मराठी भाषा दिन'  सर्वत्र  साजरा होत आहे.याच निमित्ताने आपली मातृभाषा जगवण्यासाठी आपणच
प्रयत्न केले पाहिजेत म्हणजेच जास्तीत जास्त व्यवहार व बोलीभाषा मराठीतूनच केले पाहिजेत.



    मराठी जगू या.
           मराठीजगवू या.
                 मायमराठीला भरजरी शालू नेसवू या.
                          मातृभाषेचा उदो‍उदो करूया.



कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस हा जगात आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू. ....आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!!


मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.


मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते.

मराठी भाषा मोठ्या भौगोलिक क्षेत्रात बोलली जाते म्हणून तिला धोका नाही असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. मराठीची व्यावहारिक पीछेहाट कमी प्रमाणात असून शैक्षणिक व ज्ञानक्षेत्रातील पीछेहाट मात्र चिंताजनक आहे हे कबूल करावेच लागेल. अशा पद्धतीने भाषा विकसित करायची जबाबदारी कुणा एकाचीच वा काही विशिष्ट संस्थांचीच नसून ही सामूहिक जबाबदारी ठरते. यासाठी आपण सगळ्यांनीच सजग होणे आवश्यक आहे.

मराठी भाषा आमुची मायबोली - म्हणजे मातृभाषा. लहान मुलं जन्मल्यापासून आईजवळच असते. तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांताची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते. आपली मराठी भाषा संस्कृत भाषेतून आली.



मराठी भाषा ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्याने तिच्या अस्तित्वाचा प्रश्न मुळीच उद्‍भवत नाही, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असा निष्कर्ष काढणे काही ठराविक मर्यादेपर्यंत ठीक असले, तरी मराठी यापुढे महाराष्ट्रात कशा पद्धतीने अस्तित्वात राहू शकेल हा मात्र चिंतेचा विषय ठरावा अशीच परिस्थिती आहे. मराठी कसदारपणे संवर्धित होण्यासाठी तिच्यात महाराष्ट्रातील बोलीभाषांचे प्रभावी उपयोजन होणे आज आवश्यक आहे. 


संवादाची कामचलाऊ मराठी भाषा कधीच मरणार नाही. मात्र तिचे क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होऊन ती फक्त ग्रामीण आणि झोपडपट्टीतल्या व्यवहारात पाहायला मिळेल. अशा पद्धतीने तिचे महत्त्व कमी होत जाणार असल्यामुळेच हा चिंतेचा विषय ठरतो.  मराठीवर हिंदी/ इंग्रजीचे आक्रमण होऊ लागल्यामुळे मराठी भाषेचे अस्तित्व धोक्‍यात येऊ लागले आहे. मुंबईमध्ये तर सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेमध्ये काही विचारणे खूप कठीण झाले आहे. मराठी भाषा जपण्यासाठी मराठी भाषकांनी पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे. तरच मराठीचे अस्तित्व अबाधित राहील. कोणत्याही भाषेला विरोध करण्याचा माझा हेतू नाही; परंतु झपाट्या प्रगती होत असलेल्या महाराष्ट्रानं आपली मराठी भाषा, आपली संस्कृती जपणं, हे तितकंच महत्त्वाचं आहे. हिंदी अथवा इंग्रजी बोलू नये.परंतु सार्वजनिक ठिकाणी प्राधान्य मराठी भाषेला असावं; शक्‍य नसेल तिथं आपण इतर भाषा वापरणं गरजेचं आहेच. कारण जागतिकीकरण, तसंच परप्रांतीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यामुळेच महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे, ही गोष्टही आपल्याला विसरून चालणार नाही. परंतु महाराष्ट्रात आलेल्या अमराठी लोकांमध्ये मराठीचा प्रसार करणं, हे प्रत्येक मराठी भाषकाचं कर्तव्य आहे, असं मला वाटतं. 


आज मराठी भाषेची गणना ज्ञानभाषा म्हणून केली जात नाही. मराठी माणसांना मराठी लिहिता-वाचता येत नसेल तरी त्याच्या ज्ञानग्रहणात अडथळा येत नाही.आजच्या इंटरनेट क्रांतीनंतरच्या जगात आम्ही जर आमची लिपी जगवू शकलो नाही तर भाषा काय जगवणार? ज्ञानभाषा होण्यासाठी प्रथम मराठी भाषा जगली पाहिजे. ती निरनिराळ्या ज्ञान क्षेत्रांत वापरली गेली पाहिजे. जगभरात कुठेही वापरता आली पाहिजे. तरच ती ज्ञानभाषा होऊ शकेल.  


 अमराठी लोकांचे वर्चस्व मराठी भाषिक राज्यात अशा काही तर्‍हेने होत राहिले की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे,असे खेदाने म्हणण्याची पाळी आली. अमराठी लोकांचे वर्चस्व  मोडून काढले पाहिजे.


मराठी भाषा संस्कृतपासून जन्माला आली नसून, ती संस्कृतइतकीच जुनी भाषा आहे आणि ती अभिजात भाषाच आहे.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त मिळवा.





                         बोली टिकली, तर टिकेल मराठी









No comments: