Sunday, March 23, 2014

संधी



  आपल्याला जीवनात अनेक संधी  मिळत असतात खरी संधी ओळखून त्या संधीचे सोने करणारे. आयुष्यात यशस्वी होत असतात.आपणाला मिळालेल्या प्रत्येक संधीचे आपण सोने करावे व आयुष्यात यशस्वी व्हावे.संधी ओळखून ती बरोबर साधली तर त्याचा फायदा होतो.पण गमावलेली संधी ती परत मिळवता येत नाही.

  संधी ही पहिली असते किंवा अखेरची असते.पहीली संधी साधता आली नाहीतर  शेवटची साधली  पाहिजे. स्वत:ची क्षमता, आवड, इच्छा व प्राप्त संधी यांची सांगड घालून भावी आयुष्याची दिशा ठरविणे योग्य ठरते. त्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द व प्रामाणिक प्रयत्न फलदायी ठरतात.



काही म‍डंळी संधीसाधू असतात.त्यांना संधी कधी मिळणार याची बरोबर माहीती असल्याने ते स‍ंधीची वाट पाहत असतात."आयुष्यात संधी मिळाली नाही म्हणून मोठी प्रगती करता आली नाही, एखादी संधी जरी मिळाली असती तरी मी तिचं सोनं करून दाखवलं असतं,' अशा प्रकारचा विचार बहुतेकजणांच्या मनात कधी ना कधी येऊन जातो. यशस्वी न होण्याचं कारण बहुदा "संधीचा अभाव' हेच पुढं केलं जातं.




संधी साध्य करण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा मात्र हवी. असं असल्यास आलेली आव्हानं स्वीकारण्याची व पार पाडण्याची क्षमता व बळ आपल्यात आपसूक येतं.मोठ्या संधी या नेहमी मोठ्या आव्हानांच्या आवरणात झाकल्या गेलेल्या असतात. त्यांचं बाह्य स्वरूप हे अडथळ्यांचं, त्रासाचं, असुरक्षिततेचं असतं. या स्वरूपामुळं आपल्या समोर आलेली संधी आपल्याला ओळखता येत नाही. परिणामी, आपल्याला केवळ आव्हानंच दिसतात. संधी शोधण्याची वृत्ती निर्माण करण्याची आवश्‍यकता असते. आव्हान व संधी नेहमीच बरोबरीनं येत असतात. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा आपण नाणं उचलतो, तेव्हा दोन्ही बाजू एकत्रच येतातच. केवळ एकच बाजू येऊ शकत नाही. आपण नाणं कोणत्या बाजूनं उचलतो, हाच खरा प्रश्‍न असतो. 


खेळामध्ये संधीला मोठे महत्व असते.संधीवर खेळाचा निर्णय अवलंबून असतो.मिळालेली संधी साधली तर जय नाहीतर पराजयाला सामोरे जावे लागते.


कामाच्या व्यापात आपल्या दैनंदिनीचाच एक दिवस अचानक कंटाळा येतो. काहीच करू नये असं वाटतं. नेमक्या याच क्षणी स्वतःचं आयुष्य पुन्हा एकदा नव्यानं जगण्याची संधी आली असल्याचं लक्षात घ्या. थोडासा बदल नेहमीच सुखकारक असतो.


संधी खुणावत असते त्याची आपल्याला जाणिव नसते.पण कळते तेव्हा वेळ गेलेली असते.संकटात संधी शोधण्याचे अजब कसब  काहीजणांना  लाभलेले असते. रोजच्या  व्यवहारात याचा वापर अनेक जण वेळोवेळी करून घेत असतात.

काही वेळेला स्वतःला शोधण्याची संधी आपल्याला मिळते. काही उपक्रमातून आपल्यातील क्षमता जोखण्याची संधी मिळते.या संधीचा पूरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

काही स‍ंधीसाधू स‍ंधी साधत असतात. तर काही आळशी स‍ंधीची  वाट पाहत असतात.

एक विनोद :



ठमाकाकू : अहो, सांगा पाहू...लॉटरीचं तिकिट आणि बायकोशी भांडण यात फरक काय आहे?

बाबूराव : काही नाही...लॉटरीचं तिकिट काढणा याला जिंकायची थोडीतरी संधी असते. 



काही जणानी आपल्याला मिळणारी दुस-याला दिली पाहिजे.त्या संधीने त्याल भल होणार  असेल तर त्याला दिली पाहिजे.आपण जागा अडवून बसलो तर इतरांना  संधी मिळणारच नाही.त्यातच ती प्रतिष्ठेची संधी असेल तर तो दुस-याला कधीच देत नाही.


आगळ्यावेगळ्या संधी


मृत्यूनंतरही देहदानाने पुण्य कमवण्याची  संधी 
अनुत्तीर्ण झालेल्या विषयांत पास होण्याकरिता तब्बल दोन परीक्षांची संधी 
जागतिक मंदी ही भारतासाठी  संधी

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याची संधी

समाजाची सेवा करण्याची स‍ंधी 
पडद्यामागच्या ग्लॅमरस संधी
क्रांतिकारी स्थित्यंतराची संधी
मंदीच्या काळातही प्रगतीची संधी
संधिसाधूंसाठी अनेकानेक संधी
जबाबदार पालकत्वात निर्माण करायच्या संधी
स्वतःला शोधण्याची संधी
कमी गुण भरपूर संधी

समस्या हीच वैज्ञानिकांसाठी संधी



आपल्याला मिळाली प्रत्येक संधी गमावली पाहिजे. आपण गमावणार नाही ना?

No comments: