Thursday, April 3, 2014

ही एक विकृती


एखाद्या दिवशी सकाळी आपण व्हॉटस अॅप ओपन करतो आणि कुणा प्रसिद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असा मेसेज येतो. आपण मेसेज वाचतो, हबकून जातो. त्याविषयी चर्चा करतो, माहिती जमवण्याचा प्रयत्न करतो. पण कुठेच काहीच कळत नाही. कारण ती असते एक अफवा...

लता मंगेशकर यांचं हद्यविकारानं आकस्मिरक निधन, शाहिरी नभातून एक तारा निखळला... बाबासाहेब पुरंदरेंचं निधन, आशा पारेख यांचं निधन... असे मेसेज तुम्हाला व्हॉट्स अॅपवरच्या एखाद्या तरी ग्रूपवर मागील आठवड्यात नक्कीच आले.लोक ह्या मेसेजनी हैराण झाले.परत काही महाभागानी कोठेही खरेखोटे न करता दुस-यानांही पाठविले. मागील काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूच्या अफवांचं पेव फुटलं फुटले होते.इंग्रजीत या प्रकाराला सेलिब्रेवटी डेथ हॉक्स म्हणतात. 'मि.बीन' नावाने जगभरात ओळख असलेला सुप्रसिद्ध इंग्रजी हास्यअभिनेता रोवन एटकिंसन याने आत्महत्या केल्याची अफवा फेसबूक आणि ट्विटरवर पसरली होती.


सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे सोपे असल्यामुळे अल्पावधीतच याची लोकप्रियता वाढली, पण याचा वापर आता अफवा पसरविण्यासाठी अधिक होऊ लागला आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणे हे सध्याच्या तरुणांचे नवीन उद्योग अनेकदा समाजात अशांतता पसरविण्याचे काम करत असतात.

व्हॉट्सअप'वरून अशा प्रकराचे अनेक अफवा पसरविणारे आणि भीती निर्माण करणारे संदेश फिरू लागले आहेत. यामुळे अनेकदा लोक फसतात, तर अनेकदा भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा संदेशांना रोखणे खरोखरच पोलिसांच्या दृष्टीनेही एक आव्हान बनले आहे.


खोटे मेसेज पाठवणं, कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. मेसेज कुठे तयार झाला, हे शोधून काढता येतं. आणि संबंधित व्यक्तीने तक्रार दाखल केल्यास, तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे टेक्नॉलॉजी जपून वापरणं गरजेचं आहे.

व्हॉट्स अँप या सोशल मीडियावर मेसेज पाठविणे मोफत असल्याने विचारही न करता अनेकदा मेसेज टाकले जातात. एखादा त्याची सुरुवात करतो. बनावट, खोटा आणि दुसर्‍याची बदनामी करणारा संदेश पाठवितो. इतरही त्याची काहीही खात्री न करता तो फारवर्ड करत राहतात. त्यातून काहीही तथ्य नसलेल्या गोष्टी समाजात अतिशय झपाट्याने फिरतात. त्यानंतर काही वेळाने समजते, की असे काहीही घडलेले नाही. मात्र, या सर्व प्रकारात ज्यांच्याशी त्याच्याशी संबंध असतो, अशा असंख्य लोकांचा विनाकारण मानसिक छळ होतो. व्हॉट्स अँपवरुन बदनामी केल्याप्रकरणी अथवा समाजविघातक कृत्य करणार्‍यांचा शोध घेऊन पोलिसांनी यापूर्वी कारवाई केली आहे. सेलिब्रेटी हॉक्स डेथचा मेसेज पसरवणा-यांवर कारवाई केली नाहीतर त्याचा परिणाम अशा प्रवृत्तींचे सोकावतील.

सोशल मीडियावरील अफवांमागचे सत्य शोधून काढण्यासाठी युरोपातील काही संशोधक एका सॉफ्टवेअरवर काम करत असून या सॉफ्टवेअरद्वारे असत्य किंवा अफवा शोधून काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत.‘फेमे’ असे या सॉफ्टवेअरचे नाव आहे. ‘फेमे’मधील प्रोग्राम या अफवांचा शोध घेणार आहे. खोटी माहिती किंवा अफवा पसरवणा-यांचे स्रेत, ट्विटवरील संभाषणे तसेच ट्विटची भाषा या गोष्टींचा शोध घेण्यास ‘फेमे’चा उपयोग होईल.


याना कसला काय आनंद मिळतो अशा अफवा पसरवताना.अफवा पसरवून गोंधळ उडवून देण्यात त्याना आनंद  मिळत असणार.समाजात केवळ भीती पसरविणे आणि लोकांची फसवणूक करणे ही अशा लोकांची मानसिकता असते. यातूनच असे संदेश तयार होत असतात.सोशल मीडिया अफवांचे नवे अस्त्र झाले आहे.सोशल मीडियाचा उपयोग चा‍गंल्या कार्यासाठी केल्यास चा‍गंला उपयोग करता येतो.पण वाईटासाठी केल्यास समाजविघातक घटना घडू शकतात.

या अफवांना जन्म देणारे कारागीर इतके निपुण असतात की जनसामान्यांची मानसिकता दृष्टीसमोर ठेवून अशा प्रकारच्या अफवा पसरवितात ज्या ऐकल्यानंतर विवेकशक्ती, संयम व भान राखणे होत नाही. अफवामुळे निर्माण होणारा हा भयावह प्रक्षोभ इतका तीव्र व प्रबळ असतो की त्याला आवर घालणे कठीण  जाऊ शकते.


इंटरनेटमुळे माहितीचा खजिना उपलब्ध झाला असून याद्वारे सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही वेळा अफवा पसरविणे तसेच जातीय सलोखा बिघडविणे यासाठीही या सोशल मिडीयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी विश्वासाहर्ता जपण्याबरोबरच जबाबदारीचीही जाणिव ठेऊन काम करावे.




 "समाजास भयभीत करणाऱ्या अफवा पसरविणे हा गुन्हा ". 

No comments: