Saturday, October 25, 2014

मुलांनी किल्ले बनवावेत.


किल्ले बनविणे ही आपल्या महाराष्ट्राची परंपराच आहे. आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. इतिहासकालीन पराक्रम आणि संघर्षाची गडकिल्ले प्रतीके आहेत.

मातीचे किल्ले आणि दिवाळी हे एक अतुट नातं आपल्याकडे दिसून येतं.दिवाळीच्या दिवसात तुम्ही एक फेरफटका मारल्यास प्रत्येक घरी एक लहानसा का होईना किल्ला हा असतोच. मातीचा किल्ला बनविण्याची मजा काही औरच असते. बरेचदा या कामात आपल्या बच्चे कंपनीला घरातील ज्येष्ठांची मदत होत असते.
फराळ, फटाके, रांगोळी आणि नव्या कपडय़ांबरोबरच दिवाळीचा अविभाज्य घटक म्हणजे घराबाहेर मुलांनी बनविलेले मातीचे किल्ले. लहान मुले इतिहासाच्या पुस्तकात असणारे किल्ले दिवाळीच्या सुट्टीत जशाच तशा स्वरूपात माती, दगड व वीटांनी बनवत असतात. त्यांची हुबेहुब किल्ले बनविण्याची कला मोठयांना चकित व आचंबीत करणारी असते. शिवाजी महाराजांचा इतिहास आज जरी बरीचशी तयण पिढी विसत चालली असली तरी आजची बच्चे कंपनी मात्र महाराष्ट्राचा मराठ मोळया इतिहास संस्कृतीची आठवण दिवाळीच्या किल्ल्यांच्या स्वरूपात ताजी करत असतात. 




आजची बच्चे कंपनी तरूणाच्या चंगळवादी, पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍या तरूण पिढीला मात देत बच्चे कंपनी आपली परंपरा, संस्कृती व आपला इतिहास दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना आठवण करूण देत असातात. किल्ला बनविण्यासाठी लहान मुलं दगड,माती, विटा, पाणी लाकडे मिळवण्यासाठी दुपारी उन्हा- तान्हात फिरत असतात जरी पूर्वीच्या दिवसा सारखाचेच दिवस असले तरी बदल हे निश्‍चितच झाले असून बदलत्या काळाबरोबरच आधुनिकतेची सांगड पहावयास ग्रामीण भागात मिळत आहे. एरवी संगणकीय पडद्यावर ऑनलाइन विश्वात दंग असणारी मुले किल्ले बनविण्याच्या निमित्ताने का होईना मातीत हात घालतात. विशेष म्हणजे विविध पक्ष, संस्थांच्या माध्यमातून किल्ले स्पर्धाचे आयोजन केले जात असल्याने आणि त्यात पारितोषिके मिळवण्यासाठी काल्पनिक आणि रेडिमेड किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्यांची छोटी प्रतिकृती बनवण्याकडेच मुलांचा अधिक कल दिसून येत आहे. त्याचप्रमाणे किल्ल्यांची माहिती व्यवस्थित मिळवण्यासाठी किल्ल्यावर प्रत्यक्ष भेट देण्याबरोबरीनेच गुगल मॅप आणि इमेजेसच्या साहाय्याने किल्ला अधिक रेखीव व्हावा यासाठी बच्चे कंपनीकडून प्रयत्न होत आहेत.लहानमुलांना किल्ले बनविण्याची आपली संस्कृती इतिहास जपण्यात उत्तेजन,स्फूर्ती देण्यात मोठयांनी कुटूंबियांनी पुढाकार घ्यायला हवातर सेवाभावी संस्थांनी,सार्वजनिक मंडळे, राजकिय पक्षांनी किल्ले स्पर्धा राबविण्याची गरज आहे.



महाराष्ट्राच्या गतवैभवाची साक्ष देणारे किल्ले शासकीय दुर्लक्षिततेमुळे ढासळू लागले असताना या किल्ल्यांच्या इतिहासाची उजळणी विद्यार्थ्यांमध्ये व्हावी या उद्देशाने सुरू झालेला 'दिवाळीतील किल्ले' बनवण्याचा उपक्रम अपुऱ्या जागांमुळे कमी होऊ लागला आहे. विविध राजकीय पक्ष आणि संस्था किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून या उपक्रमांना बळ देत असल्यामुळे विविध सोसायटय़ांच्या परिसरात किल्ले बनवण्यामध्ये रममाण झालेले विद्यार्थी दिसतात. त्यातही रेडिमेड अथवा काल्पनिक किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याकडे त्यांचा कल वाढू लागला आहे. 

किल्ले बनवण्याचा उद्देश केवळ मनोरंजन किंवा खेळ नसून त्यामुळे आपल्यातील प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळतो. त्या माध्यमातून अनेक नवनवीन क्लृप्त्या आपल्या डोक्यात येत असतात.

ठाण्यातील बी केबिन येथील कलावती भवन परिसरातील १६ मुलांनी ५ दिवसांमध्ये राजगड साकारला असून त्यासाठी या मुलांनी थेट राजगड गाठले. तेथील दुर्गकलेची पुरेपूर माहिती या विद्यार्थ्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे किल्ला हुबेहूब साकारण्यासाठी या विद्यार्थ्यांनी गुगल मॅप, आणि गुगल इमेजवरून या किल्ल्याच्या नकाशाची छायाचित्रे घेऊन त्याचा उपयोग या विद्यार्थ्यांनी करून घेतला. राजगडची संजीवनी माची, सुवेळा माची, पद्मावती माची आणि बालेकिल्ला याची परिपूर्ण माहिती घेऊन येथील मुलांनी हा किल्ला साकारला आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधी या मुलांनी किल्ला साकारला असून या देखण्या किल्ल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आहे. किल्ल्याची ओळख करून देणारे छोटे माहितीपत्रक लावण्याबरोबरच या विद्यार्थ्यांनी येथे येणाऱ्या प्रत्येकाला किल्ल्याची परिपूर्ण माहिती देण्याचीही व्यवस्था केली आहे.


महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य पातळीवर अशी किल्ल्यांची स्पर्धा आयोजीत करुन या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे.शाळेच्या सुट्टीत मुलांकडून कील्ले बनवून घेण्यात यावेत.तरच किल्यांचे महत्व मुलांना कळेल.मुलेही मजेत व आवडीने किल्ले बनवीतात.त्यांना शाबासकी देऊन कौतुक केल्यास त्या मुलांना आनंद मिळेल.

No comments: