Friday, October 17, 2014

ग्राहकांची विश्वासार्हता राखावी.


 स्नॅपडीलच्या व फ्लिपकार्टने इंटरनेटवर भरविलेल्या महाबाजाराचे कवित्व अजूनही सुरूच आहे. या खरेदी महोत्सवाच्या गंगेत कोटय़वधी ग्राहकांनी आपले हात धुवून घेतले. त्यातील अनेकांना सौद्यात फटका बसला, काहींची खरेदी मनासारखी न झाल्याने नाराज झाले.त्यांनी समाजमाध्यमांतून एकच गदारोळ केला.


'सेल', 'डिस्काऊंट' असे शब्द ऐकले रे ऐकले की जगातील कुठल्याही ग्राहक राजाचे कान टवकारतातच. भारतीय ग्राहकांची मानसिकता काही वेगळी नाही. त्यामुळे फ्लिपकार्टने जाहिरातींचा मारा करून भरवलेल्या या महाबाजारावर कोटय़वधी लोकांच्या उडय़ा पडणातात.


कोणतीही वस्तू प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आणि स्पर्श केल्याशिवाय ती खरेदी करता येते, ही संकल्पना रुजायलाच भारतात इतका वेळ लागला. पण कालांतराने या प्रकाराने विश्वासार्हता कमावली. आता ऑनलाइन शॉपिंगमधून वाचणारा वेळ आणि पैसा याचं महत्त्व ध्यानात आल्यावर अनेकजण 'वन क्लिक ग्राहक' झाले आहेत.भारतीय ऑनलाइन शॉपिंगमध्ये स्वस्त आणि तीन ते चार दिवसांत घरपोच वस्तू देण्याच्या दोन सोयी ग्राहकांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाच्या असून ऑर्डर देण्यासाठी स्मार्टफोन आणि शॉपिंग अॅप्लिकेशनचा वापर वाढताना दिसत आहे.


ऑनलाइन शॉपिंगची फ़ायदे...
सुरक्षित खरेदी,वेळ आणि श्रम वाचतात,घरी बसून खरेदी करता येते,जास्त पर्याय,कधीही खरेदी करता येते,चांगली सूट/ कमी किंमत,प्रॉडक्टची सगळी माहिती मिळते,तुलना करून खरेदी करता येते,ग्राहकांची मते कळतात.

ऑनलाइन शॉपिंगची तोटे....
तत्काळ हवी असणारी वस्तू घेता येत नाही,गरज नसणाऱ्या वस्तूंची खरेदी,वस्तूचा दर्जा तपासता येत नाही,अनेक पर्याय असल्याने गोंधळ उडतो,फसवणूक होण्याची भीती,लहान वस्तूंसाठी शिपिंग चार्जेस देणे.

फ्लिपकार्ट व स्नॅपडील या दोन्ही कंपनीने मिळून सुमारे बाराशे कोटींची विक्री केली. तीही अवघ्या दहा तासांत.ह्या व्यवहाराला मॉलला काही वर्षे व्यवसाय करावा लागेल.तसेच येथे महागाई दिसली नाही. महागाई आहे तर एवढ्या कमी वेळात मोठी विक्री झाली आहे. ग्राहकांचा अधिक फायदा होऊ लागल्याने  ग्राहकांचा अधिक फायदा होऊ लागल्याने ऑनलाइन खरेदी वाढत आहे.



आज भारतातील ऑनलाइन खरेदीचे क्षेत्र झपाट्याने वाढत असले तरी भारतीय ग्राहकांमधील मोठा वर्ग आजही ऑफलाइन खरेदीलाच महत्त्व देताना दिसतो.वस्तूला हाताळून पाहण्याची भारतीय ग्राहकांची मानसिकता आजही टिकून असल्याने ऑनलाइन प्रॉडक्टवर त्यांचा विश्वास बसत नाही. ऑनलाइन पेमेंटवर बऱ्याचशा ऑफर देण्यात येत असल्या तरी आजही अनेक भारतीय ऑनलाइन व्यवहार करण्यास घाबरतात. फसवणूक होण्याची भीती, सायबर क्राइमचा वाढता आलेख यामुळे अनेकजण कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी)चा पर्याय स्वीकारतात.  


ऑनलाइन खरेदीने पूर्वापार पद्धतीने व्यापार करणाऱ्यांना धोक्याचा इशारा आहे. आणि त्यांनी त्याची दखल घेतलीही आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने तर या इंटरनेटवरील महादुकानांची चौकशीच करण्याची मागणी केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडे केली आहे. त्यांचे म्हणणे असे की ई-व्यापार करणाऱ्या या कंपन्या ग्राहकांना एवढय़ा मोठय़ा सवलती, त्याही नेमक्या सणासुदीच्या दिवसांत देऊच कशा शकतात? तेव्हा त्यात काहीतरी घोळ नक्की आहे. त्यांच्या व्यापाराच्या पद्धती, त्यांचे व्यवसायाचे प्रारूप या सगळ्याची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यांच्यावर नियंत्रणे घालायला हवीत. 


सवलतीच्या दरात खरेदी जाहीर करून गोंधळ उडविलेल्या ई-कॉमर्स व्यासपीठावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार विचार करत असून या क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण आणण्याचे संकेत आहेत.


जर ग्राहकाची   फसवणुक  झाली तर ह्या व्यापाराला धोका  निर्माण  होईल. ग्राहकाची  विश्वासार्हता राखली तर  हा व्यापार मध्यम  व उच्च  मध्यमवर्गापुरता मर्यादीत न  राहता   गरीब  ग्राहकापर्यत   पोहचण्यास वेळ लागणार नाही.      

No comments: