Sunday, October 5, 2014

चूकीची विचारसरणी



बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरलेल्या आणि शिक्षा मिळालेल्या जयललिता या देशातल्या पहिल्या मुख्यमंत्री आहेत.मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली, म्हणजे जणू काही राज्यावरच फार मोठे आकाश कोसळले, असा त्यांच्या अनुयायांचा समज झालेला आहे. त्यांनी सुरू केलेला आक्रस्ताळेपणा संतापजनक आहे.राज्यात हिंसक वातावरण तयार झाले असून, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेबद्दल दु:ख व्यक्‍त करण्यासाठी तमिळनाडूतील चित्रपटसृष्टीने ‘बंद’ पाळला.जयललितांना शिक्षा जाहीर होताच, तामिळनाडूत आत्महत्यासत्र सुरू झालंय. कोर्टाचा निकाल ऐकून अम्मांच्या तीन भक्तांनी गळफास लावून घेतला, एकानं स्वतःला पेटवून घेतलं, एकानं विष पिऊन आत्महत्या केली तर एकानं चालत्या बससमोर उडी मारून स्वतःचं जीवनं संपवलं. हळव्या मनाच्या दहा समर्थकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. १२वीच्या एका विद्यार्थिनीसह दोघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.  


तमिळनाडूत चित्रपट कलाकारांविषयी टोकाची व्यक्‍तिपूजा आणि व्यक्‍तिस्तोम अधिक आहे. त्यामुळेच तेथे जयललिता, एम. जी. रामचंद्रन, शिवाजी गणेशन, करुणानिधी यांची मंदिरे उभारलेली आहेत. पूर्वी नेत्यांच्या निधनानंतर आत्महत्या होत, तेव्हा अशिक्षितपणा हे कारण पुढे केले जात असे. पण आता शिक्षण असूनही असे प्रकार घडत आहेत.नेत्यांवर त्यांच्या चाहत्यांचे प्रेम असणे स्वाभाविक आहे, पण त्यातून पुढचा- मागचा विचार न करता स्वतःचे जीवन संपविणे शहाणपणाचे नाही.जयललितांवरील लोकांचे प्रेमच या आत्महत्यांमधून दिसून येते. जनता त्यांना मातेसमान मानते. पण अम्मांवरील प्रेमापायी आत्महत्यांचा मार्ग कुणीही स्वीकारू नये. 


जनतेने प्रादेशिक अस्मिता जपताना प्रादेशिक पक्ष, त्यांचे नेते आणि तमीळ चित्रपट, त्यातील कलाकार यांनाच कायम आपल्या हृदयात स्थान दिले. या सर्वांच्या बाबतीत जनतेच्या भावना कमालीच्या टोकाच्या असतात. भावनेच्या भरात टोकाचं पाऊल उचलणे योग्य नाही.स्वतःच्या आयुष्य पेक्षा कोणीच मोठे नसते.कोणासाठी जीव द्यावा हेही या तरुणांना कळ्त नाही का?भ्रष्टाचारी नेत्यासाठी आत्महत्या करतात.ती  मडंळी कर्मदरिद्री ठरतात.आत्मह्त्या करणा-यांच्या कुंटुबीयांना कोण मदत करणार?खरोखरच त्या मृत्युला देखील अत्यंत लाज वाटली असावी या लोकांच्या भ्रष्ट आदर्शवादी नेत्यासाठी केल्या गेलेल्या आत्महत्येची.नेत्यांनी भ्रष्टाचार   करू नये याकरीता  सामान्यजण का आत्महत्या करीत नाहीत?भष्टाचार करणा-यांसाठी जीवन संपवणे म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.आत्महत्या केल्याने कोर्ट काय जयललितांची शिक्षा रद्द करणार का?खंर म्हणजे माणसाला आत्मह्त्या करण्यास कारणीभूत ठरावी  अशी समस्या या जगात  अस्तित्वातच नाही. माणसाची चूकीची विचारसरणीच त्याला आत्मह्त्या करण्यास प्रवृत्त करते.हे खरे ठरले आहे.

No comments: