Sunday, December 21, 2014

हिंसाचाराला रोखण्यासाठी जगाने एकत्र यावे.


      
पेशावर येथील आर्मी स्कूलवर १६ डिसेंबरला तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने केलेल्या अमानुष हल्ल्यात  १३२ शाळकरी लहान मुले मारली गेली आणि सर्व जगाचा थरकाप उडाला. दररोज बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज घुमणाऱ्या पाकिस्तानात मंगळवारी दहशतवादाचा नवा क्रूर, पाशवी, निर्घृण चेहरा समोर आला आणि अवघे जग सुन्न झाले. आतापर्यंत लष्करी-पोलिस जवान व निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादाने अमानवतेचा कळस गाठत बालपणाचीच हत्या केली.लष्करी शाळेतील मुलांना ठार मारण्याचे विकृत ध्येय समोर ठेवूनच हा हल्ला केआ गेला.या हल्ल्याने जग हादरून गेले.यावरून अतिरेक्यांनी आता नागरिकांना सोडून लहान बालकांवर लक्ष केंद्रित केले दिसते.या अतिरेक्यांना जगाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेचा अभिमानच वाटला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.या निष्पाप मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण?पाकिस्तानतल्या राजकारणाचे हे बळी आहेत.काही दहशतवाद्यांना पोसायचे व काहींच्या विरोधात अमेरिकेच्या इशाऱ्यावरून कारवाया करायच्या, या आपमतलबी भूमिकेमुळेच मंगळवारी शेकडो निष्पाप जिवांचा बळी गेला.शेजारील देशांसाठी विणलेल्या दहशतवादाच्या जाळ्यात गरफटून आपल्याच देशातील कोवळी मुले बळी पडत असतील तर दहशतवाद्यांना पोसणा-या देशाने याचा विचार करण्याची वेळ आले आहे. या दुर्दैवी घटनेतून पाकिस्तानला स्वतःच्या पाठीवरील दहशतवादाचे ओझे फेकून देण्याची खरेतर ही संधी आहे.पाकिस्तानमधल्या अराजकतेने कळस गाठला आहे असे वाटत असताना अतिरेकी नवी नवी कारस्थाने करीत आहेत. 

     एका इराणी माथेफिरू दहशतवाद्याने ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरात १७ तास जो धुमाकूळ घातला तो अंगावर काटा आणणारा होता. पण दहशतवादाची रूपे किती प्रकारांनी जगावर आक्रमण करीत राहणार आहेत.

    जगाच्या नकाशातील राजनैतिक समीकरणांमुळेही अफगाणिस्तान-पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्रबिंदू बनले.जगातील ९३ देशांमध्ये  दहशतवादी हल्ल्यात  १७  हजार जणांचा मृत्यु  झाला आहे.प्रत्येक  देश आपल्या देशातील  दहशतवादाला सामोरे जात  असतो.पण जगातील  सर्व देशाने एकत्रितपणे या दहशतवादाचा सामना केल्यास दहशतवाद रोखला जाईल.ज्या देशाने राजकारणासाठी व शेजारील  राष्ट्रांना त्रास देण्यासाठी या दहशतवादी संघटनांना  पोसल्या  आहेत.अशा  देशांवर  प्रथम  कारवाई होणे गरजेचे आहे.काही ठरविक संघटना सुडबुध्दीने दहशतवादी हल्ले करीत जगातील  शांतता भंग करीत आहेत.दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वानी एकत्र आल्यास ह्या हिंसाचाराला रोखणे शक्य होईल. 

         जगभर पसरत चाललेला दहशतवाद हे पुढील काळातील संकट आहे.त्याला रोखले पाहिजे.दहशतवादाचा बिमोड होत नाही, तोवर लढाई सुरूच ठेवावी लागणार.दहशतवादाच्या ‘हिरव्या’ संकटाने संपूर्ण जगच व्यापले आहे. सिडनीतील ‘लिंट चॉकलेट कॅफे’वरील हल्ला काय किंवा पेशावरमधील सैनिकी शाळेत तालिबान्यांनी केलेले ‘निरागसते’चे नृशंस हत्याकांड काय, इस्लामी दहशतवादाचे हे थैमान कायमचे संपविण्यासाठी आता जागतिक स्तरावरच एक सूत्रबद्ध आणि निर्णायक कारवाई होण्याची गरज आहे.







No comments: