Monday, July 27, 2015

थोर व्यक्तिमत्व हरपले


                                       डॉ. ए. जी. जे. अब्दुल कलाम 



एक अतिशय हुशार मितभाषी वैज्ञानिक. भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालीचे प्रणेते व मार्गदर्शक.  स्वतंत्र भारताच्या इतिहासात डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव सदैव आदराने घेतले जाईल.देश थोर शास्त्रज्ञाला मुकला.सदैव शिकण्यास आणि शिकवण्यास तयार असलेले डॉ. कलाम यांचा शेवटचा कार्यक्रमही विद्यार्थ्यांसाठीच झाला.भारताचे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे आपल्यात नाहीत कल्पना सहन होत नाही.देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात यांच्या सारखे अथक काम करणारा अवलिया होणे नाही.सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या डॉ. ए. जी. जे. अब्दुल कलाम यांनी देशातील अनेक तरुण मनांना कायम चेतना देण्याचे काम केले.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके असलेले "कलाम सर‘ आयुष्याच्या अखेरच्या क्षणांपर्यंत त्यांचे आवडते विद्यादानाचे काम करत राहीले.डॉ. अब्दुल कलाम यांचे  हुशार आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व मात्र सदैव स्मरणात राहील.सर्वस्वी देशाला वाहून घेतलेले,अत्यंत नम्र आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व. माझे शतशः प्रणाम.




कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वरम येथील एका खेड्यात झाला होता. एका नावाड्याच्या घरात जन्मलेले कलाम यांनी अविरत मेहनत घेत विज्ञान क्षेत्रात भारताचा झेंडा रोवला. भारताच्या मिसाइल कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे कलाम हे देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर साधेपणामुळे ते ओळखले जात होते. सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ते ओळखले जायचे.  कलाम यांचा प्रवास हा तरुण पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांसह भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. 
कलाम हे 25 जुलै 2002 रोजी भारताचे अकरावे राष्ट्रपती झाले. प्रथमच प्रत्यक्ष राजकारणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसलेली व्यक्ती राष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाली.सामान्य परिस्थितीपासून प्रारंभ करुन या पदापर्यंत पोहचलेल्या, जनतेला आपल्यातलेच एक वाटणार्‍या कलाम यांचे चरित्र कोणालाही स्फूर्तीदायक ठरेल.आजन्म अविवाहित राहून राष्ट्रकार्यासाठी आयुष्य अर्पण करणारे ते एकमेव राष्ट्रपती आहेत.

No comments: