Thursday, July 9, 2015

नवीन पिढी वेगळ्या वळणावर




सोलापूरात अपरात्री अचानक घरात शिरलेल्या कुऱ्हाड आणि करवतधारी दरोडेखोरांशी हिमतीने दोनहात करीत १५ आणि १३ वर्षांच्या भावांनी त्यांना पिटाळून लावले. बहिणीला वाचवण्यासाठी त्यांनी थेट हातावर कुऱ्हाडीचे वार झेलले, पण हिंमत हारली नाही. ही थरारक व स्फूर्तिदायक घटना रविवारी रात्री शहरात घडली. 

'वर्गातील मुलींकडे पाहतो' म्हणून १३ वर्षांच्या मुलास वर्गातीलच मुलांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना तालुक्यातील राजापूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात घडली. या दोन्ही बातम्यानी मन व्यथित झाले.

 पहिल्या बातमीत साहसाने बहीणीचे रक्षण  केले तर दुस-या बातमीत खून्नशीने मारुन टाकले. 


मुलांच्या पुढील आयुष्यात पुरूष व स्त्रिया दोन्ही येतात. त्या वेळी संबंधात मोकळेपणा राहावा, कोणताही मनोगंड राहू नये या साठी मुलामुलींचे सहशिक्षण ही उत्तम कल्पना आहे, परंतु आजकालच्या सिनेमा आदी माध्यमांमुळे चुकीचे संस्कार घडत आहेत. त्यामुळे एकमेकांकडे पहाण्याची दृष्टी निकोप राहिली नसेल. नुसत मुलींकडे बघतो म्हणून नसेल मारलं. दुसरी पण काहीतरी खुन्नस असेल त्याच्यावर. बहुतेक त्याच्या मित्राला पण तीच एखादी मुलगी भाव देत असेल जिच्यावर ह्या अकरा जणामधला एकाचा किवा त्यांच्या मित्राचा जीव जडला असेल.खूपच वाईट घटना आहे. एखाद्या विद्यार्थ्यालाएवढे मरे पर्यंत मारत असताना शिक्षक आणि इतर मंडळी झोपली होती का? अशा घटना शाळेत घडतात ही विचार करायला लावणारी घटना आहे.


सर्व माध्यमांनी समाजाला लावलेल्या हिंसा व लैंगिकतेच्या रतीबाचे पडसाद म्हणजेच एका तेरा वर्षाच्या मुलाला त्याच्याच समवयस्क मुलांनी जीवघेणी मारहाण करणे होय. प्रश्न एवढाच आहे की, आपण ह्या धोक्याच्या घंटेने जागे होणार आहोत का ?

 हल्ली लहान मुलांमधे चीड चीड आणि पटकन भडकण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्या पटकन अलेल्ल्या रागामुळे मोठ्या चुका करतात आणि अपराध घडतो. मुलाना पालकानी आणि शाळेत शिक्षकानी समुपदेशन करायला हवे. त्यांच्याशी सतत संवाद साधायला हवेत. नाहीतर भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आहे.


विद्यार्थिदशेतच योग्य आदर्श आणि ध्येय समोर ठेवणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवायला हवी, त्यांच्यावर चांगले संस्कार करायला हवेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संस्कार महत्त्वाचे असतात.

 वेगवेगळ्या कारणाने नवीन पिढी बिघडते आहे.त्यांच्या वेळीच निंयत्रण आणणे गरजेचे झाले आहे.पालकांनी आपल्या मुलाच्या वागणुकीचा अभ्यास केला पाहिजे.नवीन बदल घडत असतील तर त्याला तेथेच रोखले पाहिजे.चुकीची जाणीव होण्यासाठी तात्काळ शिक्षा करणे आवश्यक : मुलांच्या हातून चुकीच्या कृती घडत असतांना त्यांना त्याची जाणीव तात्काळ करून देऊन शिक्षाही करायला हवी. 


अनिष्ट गोष्टींचा प्रसार थांबविण्यासाठी सुसंस्कारीत पिढी घडविण्याची जबाबदारी आपलीच आहे. 

No comments: