Friday, January 10, 2020

शेकोटीची उब



                                                         शेकोटीची उब

जी स्वतः जळते अनं दुस-यास ऊब देते ती ' शेकोटी '. शेकोटी म्हणा, कॅम्पफायर म्हणा की आणखी काही. नाव बदलल्यानं फरक पडत नाही, की शेकोटीची उब काय बदलत नाही.

मित्रांसह ट्रेकला गेलो.रात्री गुन्हेत राहण्याची संघी मिळाली होती.मस्त थंडी पडली होती.सुर्यास्त झाल्यावर गुन्हेत अंधार पडण्यास सुरुवात झाली.मित्रांनी पाण्याच्या टाक्यातून पाणी आणून ठेवले. गुन्हेत बॅट-या लावून उजेड करण्यात आला.बॅटरीने गुन्हा तपासली. कोठे कृमीकिटक नसल्याची खात्री करुन घेतली.काट्या आणून दगडावरची चुल पेटवून आणलेल्या वस्तूतून खाण्याचे पदार्थ शिजवले.चुल पेटवल्याने गुन्हेत धूर झाल्याने गुन्हेतून बाहेर आलो. तेव्हा दूरवर गावातले दिवे लुकलुकताना दिसले.तर आकाशात चांदण्या चमकताना दिसल्या.हाच अनुभव अनुभवण्यासाठी आलो होतो.भुक लागल्याने जेवण केले.शिजवलेले सर्व पदार्थही पटकन संपले.    

जेवणानंतर आवराआवर करुन स्पिपिंग बॅग काढून अंथरल्या.शुभ्र चादणं पडलं होतं.गुन्हेच्या बाहेरचं जग स्पष्ट दिसत होतं.एका मित्राला बाहेर जंगलात फिरायला जाण्याची कल्पना सुचली.बॅट-या घेऊन निधालो.एकजण येण्यास तयार नव्हता.पण गुन्हेत एकाटाच राहणार या भितीने तोही निधाला.किर्र काळोखातून एकामेकाच्या पाठीमागाहून पुढे जात होतो.झाडाझुडुपात हालचाल दिसली नी आम्ही पाठी गुन्हेकडे फिरलो.येताना वाटेत आम्ही सुकलेल्या झाडाच्या फांद्या व काठ्या जमा केल्या. 

त्या जंगलात व गुन्हेत आमच्या शिवाय दुसरे कोणीच नव्हते.आम्ही शेकोटी करण्याचे ठरवले.थंडीत थोडी ऊब मिळेल व गप्पा करता येतील.आणलेल्या सुकलेल्या फांद्या पेटवल्या.शेकोटी पेटल्यावर सर्वजण शेकोटीच्या बाजुला गोलाकार बसलो.



गाणी सुरु झाली.पेटलेल्या शेकोटीच्या समोर स्वराज्याच्या गाण्यानी सुरुवात केली.शौर्यगीत,भक्तीगीत,भावगीत व नंतर पिकनीकची गाणी झाली.मग गप्पा कधी रंगल्या ते कळलेच नाही.एका मित्राने ट्रेकमधले केलेल्या मोहिमांची साहसाची माहीती दिली. हिमालयातील मोहिमांची माहीती दिली व हिमालयातील मोहिमा आवर्जून करण्याची विंनती केली.दुसरा मित्र पहिल्यांदा ट्रेक आल्याने त्याने त्याच्या शालेय व  कॉजेलच्या जीवनातील गमतीजमती सांगितल्या आम्ही खुप हसलो व त्याची टिंगलही केली. शेकोटीच्या उबेत गप्पाही रंगत होत्या.एका मित्रांनी कलाकारी केली. वेगवेगळ्या अभिनेत्र्यांचे आवाज काढले.डॉयलोग बोलला. एकपात्री प्रयोग साकारला.एका मित्रानी मोबाईल काढून त्यांनी वाचलेल्या काही पुस्तकातील त्याला आवडलेले प्रसंग वाचुन दाखवले.सर्वाना ते प्रसंग भावले. एका मित्रांनी राजकारणावर बोलण्यास सुरुवात करताच त्याला तेथेच थांबवले.या ठिकाणी राजकारणावर भाष्य नको,असे त्याला समजावले.मग त्याने शिवरायांच्या इतिहासातील विशेष व्यक्तींचा पराक्रम आमच्या समोर उभा केला. गप्पाची मैफल आता चांगलीच रंगली होती.रात्रभर शेकोटी पेटत ठेवत गप्पा मारण्याची सर्वाची तयारी झाली होती. कोणीही झोपण्यास तयार नव्हता.वेळ खुप झाली होती.एक मित्रांनी त्याच्या ऑफिसमधल्या मजामस्ती संगितली.बॉसची टिंगल टवाळी केली.मंडळी काय झोपायचे नाव घेत नव्हती,काय करायचे. मी एक युक्ती केली.माझ्यावर वेळ आल्यावर मी भुताच्या गोष्टीं व अनुभव सांगण्यास सुरुवात केली आणि लागलीच शांतता झाली.सगळे चीडीचुप झाले.मगच्या एका ट्रेकमध्ये एका मित्राने सांगितलेल्या भुताखेतांच्या गोष्टी शेकोटी समोर या सर्वांना आवाज काढून सांगत होतो.मला वाटले हे माझी चेष्ठा करतील पण झालं उलटच ते सगळे धाबरले होते.आजूबाजूला काळोख     असल्याने भीती    वाटत होती.एकजण   थरथरत उठून स्पिपिंग बॅग मध्ये  घुसला.तसा मी सांगायचा थांबलो.सुकलेल्या काट्या संपल्याने शेकोटीतील आग कमी झाली होती.शेकोटीसाठी काट्या आणाव्या लावतील म्हटल्यावर कोणीच येण्यास तयार नव्हता.माझे काम झाले होते.शेकोटीनेच आम्हाला आता झोपा असे सांगितले होते.

                    शेवटी झोपायला जाण्यापूर्वी शेकोटी विझवायचो विसरलो नाही.

No comments: