Monday, March 23, 2020

रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

                                                रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

’करोना’ ला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन राज्यात जनता संचारबंदीला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने रस्ते ओस पडले होते. रोज वाहतुक कोंडीने भरलेल्या रस्त्यांनी रविवारी रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास घेतला...


रोज पहाटेपासून रात्रीपर्यत रस्त्यावर वर्दळ सुरु असते. मॉर्निंग वॉक ते लेट नाईट घरी येणारे रस्त्यावर दिसतात.गाड्या तर दिवसभर पळत असतात.आज कसे कोणीच रस्त्यावर दिसले नाहीत? काय झाले ते कळत नाही. याकरीता रस्ता चिंतेत होता.पहाटे काठी टेकत फिरणा-या आजोबा लोकांची धीमी वाटचाल व त्यांच्या गप्पा एकायला मिळाल्या नाहीत. कालही कोणाकडून उद्द्या येणार नाही असे कळलं नव्हतं.म्हणुन आज काळजी वाटत होती.महिलांच्या स्वंयपाक घरातील गोष्टी व तरुणांचे रनींग करतानाचे रॉक संगीत व मोबाईवरील हायटेक गप्पा ऐकालया मिळाल्या नाहीत.सहकारी सोसायट्यांच्या सभासदांचा वाद ऐकायला आला नाही.घामाचा वास घ्यावा लागला नाही.आज हवेत  सुखद गारवा आहे.पेपरवाला व दुघवाले फक्त दिसले.तर खादी वर्दीतले पोलीस रस्त्यावर कोणी जाऊ नये असे सर्वांना दटावत होते.एकही दुकान उघडले नाही व फेरीवाला बसला नाही.   

तरीही काही तरुण मोटारसायकलवरून बाहेर पडले.चला   कोणीतरी आले     असे रस्त्याला वाटले.पण पुढे पोलीस उभे असलेले पाहिल्यावर ते तरुण लगेच मागे फिरले.पोलीसांची दहशत पाहून रस्ता खुष झाला.बरं झाले आज आराम करता येईल.मनुष्यजातीने मानवाला रस्त्यावर येण्याची बंदी घातलेली दिसते.का बरं असं झालं असेलं?

थोड्यावेळाने एक सफेद  रंगाची पोलीसांची जीप फिरु   लागली.स्पिकरवर    काही तरी सुचना देत   होती.शांतता भंग करीत होती. आज स्कुलबस,रिक्षा,बसेस,ट्र्क,कार व माणसं रस्त्यावर     नसल्याने कंटाळा आला.काय  करावे कळत नव्हते. रोजच्या सारखे गाड्यांचे हॉर्नचे आवाज व त्यातून सुटणा-या धूराने होणारे  प्रदूषण नव्हते. कसे शांत व प्रसन्न वाटते होते.रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडांमधून पक्षांचा किलबिलाट एकायला येत होतो.पक्षांचे  मधूर संगीत मी यापूर्वी कधीच ऐकले नव्हते.कोठे होते हे पक्षी? माणसांच्या गोगाटात मला या पक्षांच्या आवाज ऐकायाला मिळालाच नव्हता.आज ही संघी मिळाली.धन्य झालो. 

उन्हं चढली तसा रस्ता तापला.   त्याच्या अंगातून  वाफा   बाहेर पडत होत्या.पण    कोणीच त्याचे    हाल पाहत नव्हते.हल्ली उन्हापासून रक्षण होण्यासाठी छत्र्यावाल्याही  दिसत नव्हत्या.    शाळेतल्या मुलांना   आपल्या घरी घेऊन आजीआजोबा दिसले नाहीत. सगळं कसं चुकल्या सारखं वाटत होतं.चहाच्या टप-या बंद   असल्याने चहाच्या तलपेने  व्याकुळ झालेले चहाचे चाहते दिसले नाहीत. सगळं वेगळचं घडत होतं.

ठरलेल्या वेळेवर दिसणारे चेहरे आज रस्त्यावर फिरकलेच नाहीत.गर्दी झालीच नाही.रस्त्यावर नेहमीच फिरणारी कुत्री मात्र दिसत होती.खायला न मिळाल्यामुळे भुकेलेली दिसली.त्याचीच काय मला आज कपंनी होती.

कित्येक वर्षानी     रस्ता अशी शांतता अनुभव   होता व आश्चर्य करीत  उद्याची वाट पाहत सुस्त पहुडला होता.संध्याकाळी लहान मुलांना व  पाळीव कुत्र्यांना घेऊन फिरणारी मंडळी    रस्त्यावर आले नाहीत.प्रेमी युगलं   दिसली नाहीत.बागडणारी मुलं पाहिली नाहीत.भेलपूरी व पाणीवाल्यांचे ठेले लागले नाहीत.आजचा दिवस कंटाळवाणा गेला.कोणतीच घटना घडली नाही.एक बरं झाले कोणीच रस्त्यावर नसल्याने कोणताच अपघात झाला नाही.सर्व सुरक्षित राहीले.

कोणी तरी येईल याची वाट पाहत असतानाच सुर्यास्त झाला.वाटलं आज दिवेही लागणार नाहीत.याची मला भीती वाटत होती.पण वेळेवर दिवे लागल्याने भीती दूर झाली. दिवे लागल्यानंतर माणसं रस्त्यावर येतील या आशेत होतो.मी नाराज झालो.दूरवर कोणीच दिसत नव्हतं.फक्त रस्त्यावरील दिव्यांवर किटक नाचताना दिसले.

काळोखात वृतपत्राचा एक पान  उडत उडत रस्त्यावर आलं.त्यातली ठळक अक्षरात लिहिलेली बातमी रस्त्याने वाचली.तेव्हा कळलं आज रस्त्यावर कोणीच न आल्याचं कारण.मानव जातीने विषाणूशी केलेला आजचा विलक्षण लढा पाहून रस्त्याला भरुन आलं. 

रस्त्याने रात्री     भयाण शांतता      अनुभवली.मी मानव जातीला विषाणूपासून    कसा वाचवू शकतो? याचा विचार करीत रस्ता झोपी गेला. दुस-या   दिवशी पाहतो तर काय? मानवच स्वत:चा व इतरांचा विचार  न करता रस्त्यावर   येऊन विषाणूला फैलावण्यासाठी मदत करीत होता. पुढे काय होणार,या चिंतेत रस्ता व्यस्त झाला. 


No comments: