Monday, March 2, 2020

हत्तीचा अभिषेक



                                                         हत्तीचा अभिषेक 

पहाटेच्या थंडीत नेपाळ मधील चितवन राष्ट्रीय उद्यानास भेट देऊन हॉटेलवर आलो.चहापाणी करुन फिरण्यास बाहेर पडलो.चितवन मध्ये गावागावात हत्ती पाहाण्यास मिळाले.या हत्तींकडून कोणते काम करुन  घेत असतील हा प्रश्न पडला होता.  

नदी किनारी फिरताना मगरी किना-या पहुडलेल्या दिसल्या.काहींना दूरवर नदीच्या किनारी गेंडा डुंबत असताना देखील दिसला.असेच पुढे गेल्यावर त्या नदीच्या किनारी एक हत्ती व काही तरुण मुलांचा ग्रुप दिसला.काय चालले आहे पाहण्यास पुढे गेलो.हत्तीचा मालकांची मुलांसह चर्चा झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली. 



हत्तीच्या माहुताने हत्तीला नदीच्या प्रवाहात शिरण्याचा विशिष्ठ आवाज काढून संदेश दिला.हत्ती डुलडुलत थोड्याशा पाण्यात शिरला.त्यापाठोपाठ एक सडपातळ मुलगी पाण्यात शिरली.पुढे काय होणार?ते आम्ही पाहत होतो.हत्ती पाण्यात पहुडल्यानंतर माहुताने मुलीला हत्तीवर बसले.हत्ती उभा राहिल्यावर बाहुबली सारखाच माहुत हत्तीच्या सोंडेवरुन चढत हत्तीच्या मस्तकावर आरुढ झाला.  







मुलगी हत्तीवर बसून आनंद घेत होती.हत्ती डुलडूलत पाण्यात शिरला व उभा राहिला.माहुत हत्तीवर उभा राहून बसलेल्या मुलीच्या मागे जाऊन उभा राहीला.त्याने हत्तीला आवाजाने इशारा दिल्यावर हत्तीने सोंडेत पाणी भरुन घेतले व पाठीवर बसलेल्या मुलीवर उडविले.थंड पाणी मुलीच्या अंगावर पडल्याने ती शहराली.पण तिला मजा आली होती.माहुताने पुन्हा इशारा दिल्यावर हत्तीने पुन्हा ती कृत्ती केली.असे चार पाच वेळा झाले.मुलगी  हत्तीच्या अभिषेकाने खुष झाली होती. या सर्व जलक्रिडेचे किना-यावरून फोटो काढले जात होते.फोटोसाठी ती मुलगी वेगवेगळ्या पोझेस देत होती. 



हत्ती पाण्यात पहुडल्यावर मुलगी पाण्यात खाली उतरली व तीने हत्तीला गोंजारले व त्याच्यावर पाणी उडवीत त्याच्याशी  खेळली.या सर्व जलक्रिडेचे त्या मुलीने हत्तीच्या मालकाला काही पैसे दिले.पैशापेक्षा तिला मिळलेला आंनद मोठा होता.





हा सर्व प्रकार पाहून मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.गावात हत्तीचा उपयोग या खेळासाठी करतात







No comments: