Saturday, March 28, 2020

एक विषाणू साला दुनियाको.......



एक विषाणू साला दुनियाको.......

हा विषाणू डोळ्यांना काय सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नाही एवढा सूक्ष्म पण त्याची मात्र दहशत भयंकर.या विषाणूच्या भितीने संपूर्ण जग घरात बसलाय.त्याच्या संसर्गाने होणारे परिणामही भयानक आहेत.प्रगत देशांच्या आरोग्यव्यवस्थांनी या विषाणूसमोर जवळजवळ गुडघे टेकले आहेत.मानवजातीला थांबायला लावले.सूक्ष्म सजीवात केवढी ही ताकद? आपण विकसित केलेल्या शास्त्र व तंत्रविज्ञानाने आपण त्याला रोखू शकलो नाही? सगळे देश स्वत:ला अद्यावत व परिपूर्ण समजत होते. पण या सूक्ष्म विषाणूने प्रत्येक विकसीत देशाची पूरती उतरवली आहे.जगाला कधी वाटलं नव्हतं असे संकट येईल आणि विषाणू समोर सर्वांना नमत व्हावं लागले.संपूर्ण जग या विषाणूशी लढत आहे.काय वेळ आली जगावर?अशा प्रकारच्या घातक विषाणूला तोंड कसे द्यायचे याचा शोध घेतला जात आहे. जगातील राष्ट्रांवर दुस-याच्या मदतीची अपेक्षा करण्याची वेळ आली आहे.

युध्द सामुग्रीचा माज असलेल्या देशाने आपली लढाऊ विमानं, जहाजं, मिसाईल, बॉम्ब का सोडले नाहीत या विषाणूवर? या विषाणूच्या विरोधात युध्द सामुग्रीचा वापर का करीत नाहीत? या विषाणूसमोर युध्द सामुग्री बिनकामाची ठरली आहेत. या विषाणूला ’जैविक शस्त्र’ म्हणून वापरणार नाहीत ना? याचीच भिती वाटू लागली आहे. या विषाणूच्या विळख्यात जग तडफडताना दिसत आहे.जगाची इतकी तडफड दुसऱया महायुद्धातही दिसली नव्हती.

मानवाचा विश्वास असलेली देवाची स्थाने मंदीर,मशिद,चर्च व गुरुव्दाराही बंद करावी लागले.हा विषाणू देवावर आणि धर्मावर भारी पडला आहे.देवांनी अनेक असुरांचा वध केला असे पुराणात सांगितले गेले, पण एक विषाणू देवांवरही भारी पडला.

सोशल मीडियात तर या विषाणू तर हिरो झाला आहे.जगात आता या विषाणू शिवाय दुसरा विषय नाही.श्रीमंत व गरीब सगळेच या विषाणूवर लिहू लागले, चेष्टा करु लागले,अफवा व भिती पसरवू लागले.सगळ्याची झोप उडवली आहे.नेटिझन्स विषाणूची जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करीत आहेत. विषाणूची नागरिकांच्या मनात भीती असली, तरी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच करमणूक होऊन भीती दूर केली जात आहे.

विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्म असा सजीव असून तो इतर सजीव पेशींना संसर्ग करीत मानवाच्या शारीरीक,मानसिक, आर्थिक व वाहतुक अशा बाबींवर हल्ला केला आहे.आपली पृथ्वी हा एक विषाणूंनीच भरलेला ग्रह आहे. बरेच विषाणू आले पण याच्या इतके खरतनाक नव्हते.हा मात्र प्राणघातक ठरला आहे.



एक विषाणू साला दुनियाको.......हिलाके रखा है!

No comments: