करोना विषाणू आला नसता तर ....
काय घडले नसते...
सरकारला लॉकडाऊन करावा लागला नसता.आरोग्य खात्याला विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या यंत्रणा कार्यरत ठेवाव्या लागला नसत्या.सरकारचा वेळ, मनुष्यवळ व पैसा वाया गेला नसता.विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा मॄत्यु झाला नसता.विषाणूची लागण झालेल्यांना डॉक्टर व नर्सेसंना उपचार करावे लागले नसते.पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना टि.व्हि.वर येऊन विषाणूच्या विरोधातल्या लढाईसाठी जनतेला संबोधित करावे लागले नसते.विमान,रेल्वे व बस सेवा सुरु बंद कराव्या लागल्या नसत्या.केंद्राला राज्य सरकारांना आर्थिक मदत करावी लागली नसती.लोकांना घरात बंदिस्त व्हावे लागले नसते.पोलिस यंत्रणेला लोकांविरुध्द पहारा द्यावा लागला नसता.पोलिसांवर दगडफेक झाली नसती.करोनाची लागण झाली नसती व पोलिसांचे बळी गेले नसते.लॉकडाऊन्मुळे राज्याची अर्थिक बाजू ढासळली नसती.करोनावर नियंत्रण ठेवण्याच्या कारवाईवरुन विरोधकांनी राजकारण केले नसते.शेतक-यांची आलेली पिकं ग्राहकांपर्यन न पोहचल्याने वाया गेली नसती. फुलांची शेती वाया गेले नसती.मजूर गावाला निघाले नसते.बांधकामे बंद झाली नसती.दारु पिणारे सरकारवर नाराज झाले नसते. थाळीवादन व दिवे लावावे लागले नसते.साधू मारले गेले नसते.महसुल बंद झाला नसता.धारावी व वरळी या वस्त्यांवर महापालिकेला लक्ष्य देण्याची वेळ आली नसती.चीनकडून किट खरेदी करावे लागले नसते.जगातील देशांना औषध पाठवावी लागली नसती.जगातील व्यवहार व वाहतुक थांबाली नसती.जगातील राष्ट्रांवर दुस-याच्या मदतीची अपेक्षा करण्याची वेळ आली नसती.जगाने चीनवर राह काढला नसता.परिक्षा पुढे गेल्या नसत्या.टोळ बंद झाला नसता.सोशल डिस्टेंसिंग का पालन करावे लागले नसते.विद्यार्थांचे नुकसान झाले नसते.मच्छीमार व शेतक-यांचे नुकसान झाले नसते.
काय घडले असते...
नेहमीचे व्यवहार सुरळीत सुरु राहिले असते.कर्मचारी वेळेवर व नियमित कार्यालयात गेले असते.मुलांच्या परिक्षा वेळेवर होऊन त्यांना सुट्ट्या पडल्या असत्या.काही मंडळी आंबे खायला गावाला पोहचली असती.तरुणांची लग्न धुमधड्यात होऊन हनिमूनही झाले असते.सेवानिवृतांचे निरोपसमारंभ जोरात झाले असते.लोकांच्या सहली झाल्या असत्या.गुडी पाडव्याला शोभायात्रा निघाल्या असत्या.देशात रामनवमी जोशात साजरी असती.राम मंदीराचे काम सुरु झाले असते.सगळे उत्सव आंनदात साजरे झाले असते.परदेशवा-या घडल्या असत्या.लोकांची प्रमोशन व बदल्या झाल्या असत्या.पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची कामे सुरु झाली असती.दारु पिणा-यांना मुबलक दारु मिळाली असती.राज्याला महसुल मिळत राहीला असता.महिला खरेदीत रमल्या असत्या.महिलांनी लोणची पापड व सांडगे केली असती.नवी घरं व गाड्या खरेदी झाल्या असत्या.तयार झालेल्या घरात रहायला माणसं गेली असती.निवडणूका झाल्या असत्या.नियमित मॉनिंग वॉक करता आला असते.मटन,चिकन व मासे खाता आले असते.आंबे, फणस व काजू खावयास मिळाले असते. देशातील विकासाची कामे झाली असती.तरुणांना नोक-या मिळाल्या असत्या.
काय घडले...
विकसित केलेल्या शास्त्र व तंत्रविज्ञान कमी पडले.या विषाणूसमोर युध्द सामुग्री बिनकामाची ठरली. मानवाचा विश्वास असलेली देवाची स्थाने मंदीर,मशिद,चर्च व गुरुव्दाराही बंद करावी लागली.अपघात कमी झाले.चो-या झाल्या नाहीत.भांडणं कमी झालीत.लोकांची आजारपण कमी झालेत. प्रदुषण कमी झाअल्याने हवा व नद्याचे पाणी निर्मळ झाले आहेत. वर्क फॉर्म होम ही नवीन संकल्पना रुजली आहे. घरात एकत्र राहण्याचे सौख्य अनुभवता आले.सोसायटीतील सभासरांची एकजुट पाहण्यास मिळाली.कमी पैशात घर चालवता येतं हे कळलं.गरजा कमी झाल्या.प्रत्यक्ष न भेटता फक्त संपर्काने माणसं जोडली गेली.पशु पक्षी स्वातंत्र्य मिळाले.शत्रुता कमी होऊन मैत्री वाढली.मालिकांचे पूर्नप्रसारण पाहवत लागत आहे.बॅकेत न जाता घरातून कामे केली.पैसा कमी खर्च झाला.मुलं घरात राहण्यास शिकली.ऑन लाईन शिक्षणाची सुरुवात झाली.
करोना विषाणू आला पण आपल्याला खूप काय शिकवून जाणार आहे.पर्यावरणात आपण केलेली ढवळाढवळ चुकीची आहे हे आपल्या निर्दशानात आले आहे.जगात मोठा बदल अपेक्षित आहे.विषाणूच्या संकटाचा आपल्यावर कोणता परिणाम झाला आहे हे काळ सांगणार आहे.
No comments:
Post a Comment