पावसाळ्यात मित्र व मैत्रीणींसह वाग़ंणी येथील 'चंदेरी' या गडावर ट्रेकला गेलो होतो. सगळे मिळुन आठ जण निघालो होतो.छान पाऊस पडत होता. सगळे वातावरण हिरवेगार व ट्रेकला अनुकुल असेच होते. गाणी म्हणत व एकामेकांची चेष्टामस्करी करीत शेतांच्या बाघांवरुन चाललो होतो. माळावरुन खाली उतरल्यावर एका छोटय़ा नदीला पाऊस झाल्यामुळे पाणी वाढले होते. आम्ही पाण्याचा अदांज घेऊन सर्वानी एकामेकांच्या साथीने हातात हात पकडुन साखळीने ती नदी पार पाडली. समोरच चढ दिसत असल्यामुळे आम्ही थोडी विश्रांती व फराळ करुन चढायला सुरु केली. थंड वातावरणात देखील उभी चढ चढताना घाम येत होता. गवत खुप वाढल्याने गवतातून वाट शोघवी लागत होती. वाटेवर काही ठिकाणी खुणा दिसत होत्या.त्या खुणांच्या मागावर आमची वाटचाल सुरु होती. मघुनच गडावरुन खाली पाण्याचा प्रवाह् उतरत होता. तो ओलांडण्यासाठी गवतातुन पलीकडची वाट दिसत नव्हती. वाट शोधयला आमचा खुप वेळ वाया गेला. वाट सापडल्यावर आम्ही पटापट चढत गेलो. धुके खुप असल्यामुळे पुढचे काहीच दिसत नव्हते. उजव्या बाजुला व्हँली व डाव्या बाजुला दाट झाडीतुन व गवतातुन वाट काढत गुहेपर्यत पोहोचलो. आमच्या ग्रुपमधल्या दोन मुलीचा पहीलाच ट्रेक असल्यामुळे त्या दोघीना त्रास जाणवत होता. ढगातच गुहा लपलेली होती. जवळचे काहीच दिसत नव्हते. पावसाने जोर घरला व जोराने पडण्यास सुरुवात झाली. आम्ही भिजल्यामुळे थंडीने गारठलो होतो. त्याच परिस्थितीत आडोशाला बसुन पटकन पोटात टाकले. सँक पटापट भरल्या व निघण्याच्या तयारीत होतो.नवख्या दोघींजणी दमल्या होत्या.आमच्यातल्या चौघांनी आम्ही पुढे होतो सांगुन सँक पाठीवर चढवल्या व उतरण्यास सुरुवात केली. त्या दोघीजणीनी दमल्यामुळे थोडावेळ थाबंण्याची विनंती केली. म्हणुन आम्ही चौघे गुहेतच थोडावेळ थाबंण्याचे ठरवले. पुढे निघालेल्या चौघांमघल्या एकाला मित्राला मुबंईत लवकर पोहचयाचे होते.त्याने पुढच्या प्रवासाचा अदांज घेऊन उरलेल्या तिघांना आपला बेत सागिंतला. त्याचा बेत ऐकुन प्रथम तिघे गोधंळले.सर्वानी एकत्र जायाचे असे ठरलेले असल्यामुळे त्यानी त्याला विरोध दर्शविला. विरोध झाल्यामुळे त्याने मागे गुहेत थाबंले आहेत त्याना याची कल्पना देऊन त्याची परवानगी घेतली आहे असे खोटे सागिंतले. उरलेले तिघे याला सोडायचे का याचा विचार करतानाच तो पुढे निघाला देखील. आम्ही त्याला थांबण्याची विनंती करीत होतो.पण त्याची ऐकण्याची तयारी नव्ह्ती.तो हात दाखवत पुढे झाडीत घुसला. आम्ही मारलेल्या हाकेला उत्तर तरी दे जा असे त्याला ओरडुन सागिंतले. काहीवेळ तो हाकेला साद देत होता. नतंर पाण्याच्या आवाजात त्याचा आवाज बंद होत गेला. थोडावेळ थाबुंन गुहेत थाबंलेल्या चौघांनी सावकाश उतरण्यास सुरुवात केली. पुढचे तिघे खाली उतरल्यावर थोडया वेळाने थाबंले.त्याना पाठीमागुन उतरणारे चौघे वाटेत भेटले. पुढे गेलेल्या मित्रानी आपल्या सर्वाना खोटे बोलुन फसवले हे सर्वाच्या लक्षात आले.मित्राला पुढे सोडल्याबद्दल पाठीमागुन उतरणारे पुढच्याना दोष देऊ लागले. आता पाउस कमी झाला होता. दोघी खुपच दमल्या होत्या. विश्रांती घेतली व पुढे उतरण्यास सुरुवात केली.आम्ही सर्वजण सकाळी वाट शोधण्यास थाबंलो होतो त्या जोराने वाहणार्या प्रवाहाजवळ पोहचलो. इतक्यात पुढे गेलेला आमचा मित्र मोठया मोठयाने ओरडत समोरच्या झाडीतुन खाली घसरत आला. आमच्या नावांने व 'वाचवा वाचवा' असे ओरडत ओरडत प्रवाहातल्या पाण्यातून ढकलत ढकलत मातीने माखलेल्या अवस्थेत आमच्याकडे घावत घावत पुढे येऊ लागला. अंगातील कपडे फाटले होते. डोळ्यावर चष्मा नव्हता. खांद्यावर सँक नव्हती. अंगावर काही जखमा दिसत होत्या. त्याची परीस्थिती पाहुन आम्ही सर्वजण धाबरलो. तो तसाच घावत घावत एका मित्राच्या अंगावर येऊन पडला. बेफाम होऊन मला 'वाचवा वाचवा' असे सारखे ओरडत होता. थरथरत होता.त्याला आम्ही सर्वानी पकडुन शांत करण्याचा प्रयत्न केला. तो खुप घाबरला होता. त्याला प्रथम पाणी पाजले व शांत केला. मुली खुपच धाबरल्या व त्याची परिस्थिती पाहुन रडु लागल्या.त्याला कोणी मारले का? जनावराने हल्ला केला का? कोठे दरीत पडला होता का? असे अनेक प्रश्न आम्हाला पडले. पुर्ण भिजलेला होता व लाल मातीमुळे लाल दिसत होता. तो शांत होऊन आपण आता वाचलो आहोत याची खात्री झाल्यावर तो काय घडले ते सांगु लागला. तुम्ही थोडे उशिरा पोहचला असता तर प्रेत तुम्हाला मिळाले असते' हे पहीलेच वाक्य ऐकुन त्यानी कोणत्या परीस्थितीला तॉंड दिले असेल याची आम्हाला लगेच कल्पना आली. तो तिघांना सोडुन जो निघाला तो लवकर घरी पोहचण्यासाठी घाईघाईत उतरत गेला. गवतातुन त्याला वाट दिसत होती तोपर्यत तो पटापट उतरला. तो जेव्हा या प्रवाहाजवळ आला तेव्हा तो गोधंळला. घाईत असल्यामुळे त्याला त्यावेळेला पलीकडची वाट सापडत नव्हती. शांतपणे त्याने वाट शोधली असती तर तो पटकन पुढे पास झाला असता. त्याने नेमके तेच केले नाही उलट तो धावपळ करीत मदतीसाठी आम्हाला हाका मारु लागला. पाण्याच्या आवाजामुळे त्याच्या हाका आम्हाला ऐकु न आल्याने त्याच्या हाकेला आम्ही साद दिले नाही. त्याच वेळेला तो बिथरला आणि त्याचा आत्मविश्वास गेल्यामुळे तो वेडयासारखा त्या जागेवर वाट शोधण्यास धावपळ करीत होता. त्याला त्यावेळेस वेगेवेगेळे भास होउ लागले. जोरात वाहणार्या पाण्याच्या आवाजामुळे व झाडीमुळे काळोख अशी भयानक स्थिती निर्माण झाली होती. वाट शोधण्यासाठी व या सकंटातुन बाहेर पडण्यासाठी शेवटच्या प्रयत्नात तो सापडेल त्या दिशेला घावत होता. कोठेही चढत होता व वाट सापडली नाही की घरंगळत खाली येत होता. गर्द रानात पावसाने केलेला काळोखात आपण ऐकटेच व आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही या विचाराने तो आणखी धाबरला. हा प्रकार खुप वेळ सुरु होता. त्याला त्याच्या कुटुंबीयांचे चेहेरे नजरे समोर येऊ लागले.अशा परीस्थितीत घाबरल्यामुळे त्याला त्याचे मरण नजरेसमोर दिसु लागले. त्याची एवढी भयानक अवस्था झाली होती. तेवढयात त्याला आमचा आवाज ऐकु आला आणि तो आमच्याकडे झेपावला. या सर्व गोष्टी त्याच्यासह बोलण्यातुन आम्ही माहीती करुन घेतल्या. आम्हाला तेथे पोहचण्यास उशीर झाला असता तर काही विपरीत घडण्याची शक्यता होती. त्यानतंरचा प्रवास सर्वानी एकत्र केला. जगंलात असे चकवे असतात व त्यात कोणी फसला तर त्यातुन बाहेर पडणारा नशीबवानच, अशी माहीती काही जाणकारांकडुन आम्हाला मिळाली. या घटने नतंर त्या मित्राने मोठा धसका घेतल्यामुळे तो पुन्हा ट्रेकला आला नाही. या घटनेमुळे मी सर्व ट्रेकरना 'ट्रेकमघ्ये आपल्या ग्रुपला सोडुन जावु नये' ही विनंती नेहमीच करत असतो.
2 comments:
Dear Vivek,
I very good content...I suggest you get more and more people to have a look at it...Looks like u are very active in treking ...Can we join your group...Of cource that is without causing any obstacle to you. We are be a part of your friends( relatve do have some protocols to follow) ...and hence friends.
Let me know...
PS: Could not go through all the write up. Wil keep sending my comments in
Nimisha
Hello Vivek,
Really very good experience to share.
vaibhav
Post a Comment