मुबंईत रेल्वेने गर्दीतुन प्रवास करीत होतो.उन्हाळा असल्यामुळे वातावरणात उष्णता होती.गाडीत खुप गरम होत होते.काही स्टेशन गेल्यावर एक गृहस्थ दोनचार थंड पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन मुखाने "प्रेमसे पियो, हसते रहो,मुस्कारते रहो, प्यारसे पियो,प्रभुका नाम लो", "भुगवाग का नाम लो, पाणी पियो, खुर्दतका जल मालिक पाणी है,पाणी अमृत है,शितल जल है,प्यारसे पियो" असे शब्द गोड स्वरात बोलत सर्वाना पाणी पिण्याचे आग्रह करीत होता. थंड पाणी पाहुन खुप जणानी त्याच्या कडुन पाण्याच्या बाटल्या घेउन पाणी प्यायले. तर काही जणाना हा पाणी पाजुन नतंर पैसे मागेल या भीतीने त्याकडचे पाणी प्यायले नाही.पाणी कुठुन भरुन आणले असेल या भीतीनेही खुप जणाने हात आखडता घेतला. मला प्रथम ह्या गर्दीतुन हे समाज कार्य करताना त्या गृहस्थाला पाहुन आश्चर्य वाटले. याचे नांव कृष्ण मोरुमल असुन तो उल्हासनगर राहतो.रोज मुबंईत कामावर येता जाता गाडीत हे पाणी पाजण्याचे समाज कार्य याच्या कडुन केले जाते. तहानलेल्या पाणी पाजणे हे मोठे पुण्यकाम आहे असे त्याचे म्हणणे होते. रोजच्या प्रवासात गाडीत न बसता हे माझे काम नेहमीच करत असतो.काहीजण मस्करी करतात तर काही नेहमीचे प्रवासी मी कधी येऊन पाणी देतो याची वाट पाहत असतात. जो पर्यत या गर्दीतुन मला जमेल तो पर्यत हे काम अथक करणार आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
1 comment:
It is so touchy. kharach kitti chhoty cchoty goshti asatat nahi ya, pan aayushybharasathi kahi tari shikavun jatat. Thanks for sharing this wonderfull thing.
Post a Comment