बोर्डीग पास घेउन ,ईमिग्रेशन व सिक्युरीटी चेक झाल्यावर गेट वर थाबंलो होतो. विमानाची घोषणा झाल्यावर आम्ही प्रथमच विमानात पाऊल ठेवले. हवाई सुदंर्या आमच्या स्वागताला दारातच हसर्या चेहर्याने उभ्या होत्या.सिटनबंर प्रमाणे आम्ही स्थानापन्न झालो. एक सिट खिडक़ीची मिळाली होती पण विमानाचा काही भाग मघ्ये आल्यामुळे खालचे काहीच दिसत नव्हते. विमान बँक़ाँकहुन आल्यामुळे अगोदरच काही प्रवासी विमानात बसलेले होते. हवाई सुदंर्या त्याना मदत करीत होत्या. मुलगा खिडकीच्या सिटवर,पत्नी मघल्या व मी गँगवेच्या बाजुच्या सिटवर बसलो. सिटवर बसल्यावर समोरच्या सिटच्या पाठीमागच्या भागावर टि.व्हि स्र्किन होता.रिमोट कंट्रोल त्या टि.व्हि स्र्किनला वायरने जोडलेला असतो. हेड फोन नतंर दिले जातात. ते प्रत्येक सिटच्या हँन्डलमघ्ये लावण्याची सोय असते.त्यामुळे दुसर्याला त्याचा त्रास होत नाही.या टि.व्हि स्र्किनचा टि.व्हिचे चँनेल व सिनेमे पाहण्यासाठी,संगीत ऐकण्यासाठी व गेमसाठी वापर करु शकतो. मुख्यत: याचा उपयोग विमानाचा स्थिती ,वेग , दिशा व अतंर प्रवाशाना दाखविण्यासाठी केला जातो. विमानाच्या कँप्टनने स्वागत करुन झाल्यावर बेल्ट लावण्याची सुचना झाली व थोडयाच वेळात विमान हलले. आता उत्कंठा वाढली होती. सुरुवातीला गाडी चालते त्याप्रमाणे विमानाला चालत चालत मुख्य रनवेवर येण्यास खुप फिरावे लागले. हळुहळु विमान धावपट्टीवर आले व वेगाने पुढे जाण्यास सुरुवात केली. सर्व प्रवाशी व विमानातील कर्मचारी वर्ग शांत बसले होते. विमानाचा वेग खुपच वाढला होता.खिडकीतुन पाहील्यास सर्व गोष्टी पडत होत्या. विमानानी आकाशात झेप घेतलेल्याची जाणीव झाली.ते उंच उंच झेपावत असलेले टि.व्ही.स्र्किन वरुनही कळ्त होते. वेगामुळे आत थोडा आवाज येतो.पण विमान आकाशात झेपावत असताना बाहेर येतो तेवढा नाही. विमान स्थिरावल्यानतंर कँप्टनशी सुचना होते. कमरचे पट्टे सैल केले जातात. प्रवाशांवरचा ताण कमी होतो.लगेच सुदंर्या त्याच्या कामाला लागतात. काहीना एसी चा त्रास जाणवत असल्यामुळे विमानात पुरवण्यात आलेली शाल घेउन पहुडलेले दिसले. बँकाँकचे प्रवाशीतर गाढ झोपेत होते. आम्ही विमानातील हालचाली न्याहळत होतो.आम्हाला हे सर्व नविन होते. खिड्कीतुन जमीनवरचे दिसण्याचे बंद झाल्यावर मुलाने सिनेमा सुरु केला. बाजुच्या सिटवरील मुलांने गेम खेळण्यास सुरुवात केली. मी हिंदी गाणी ऐकु लागलो. मघ्ये मघ्ये विमानाचे मार्गक्रमण पाहत होतो. वेळेसहीत अतंर पटापट मागे जात होते. जेवण दिले गेले.समोरच्या सिटच्या मागील भागातुन एक ट्रे खाली पाडुन डायनीगं टेबल करुन जेवण्यास सुरुवात केली. एवढया उंचीवर जेवण्याचा अनुभव वेगळाच होता. शाही भोजनाचा आस्वाद घेतला.हवाई सुंदर्या दिमतीला होत्या. शाकाहार व मासांहारी तसेच मद्य उपलब्घ असते. शैकीन मद्याची मजा लुटत होते. जेवणाचा आस्वाद घेतल्यानतंर थोडा वेळ खिडकीत बसलो.बाहेर फक्त ढग दिसत होते.निळ्या आकाशात ढगातून विमान एका जाग्यावर उभे असल्याचा भास होत राहतो.सुर्याच्या किरणामुळे ढग चमकत होते.सुर्याची किरणे विमानात देखील दाखल झालेली होती.विमानात स्वच्छ प्रकाश पडला होता. सुर्याच्या प्रकाशामुळे जास्त वेळ बाहेर पाहु शकत नव्हतो.सुर्यास्ताची वेळ जवळ येत होती तरी प्रकाशात प्रखरता होती. विमान दुबंई जवळ येत आहे हे टि.व्ही.च्या स्क्रिनवर दाखवत होते.विमानाची उंची कमी झाल्यावर जमीन दिसु लागली. वाळवंटाची पठारे व डोगंरे दिसत होती.विमानाला खाली उतरण्यास धावपट्टी रीकामी नसल्याने वरच आकाशात गोलगोल फेर्या मारु लागले. स्र्किनवर आकाशात विमान फिरत आहे हे पाहु शकतो.शेवटी कँप्ट्नने विमान खाली उतरत असल्याच्या सुचना दिल्या व कमरेचे पट्टे आवळण्याच्या सुचनाही दिल्या. विमान वेगाने खाली उतरत असताना कानाचे दडे बसल्याची शक्यता असते.जमीनीवरचे खुपसे स्पष्ट दिसत होते. पोटात गोळा येतो.विमानाचा वेग वाढलेला होता.विमान जोराने हालत होते.खाली येत असतानाच जमीनीलाविमानाचे स्पर्श केलेल्याची जाणीव होते. हवेतून जमीनीवर उतरलो.आता दुबंई विमानतळ दिसत होते. हळुह्ळु विमान फिरत फिरत एका जाग्यावर थाबंते व क़ँप्टन प्रवाशांचे आभार मानतो. विमानात एकदम गडबड व धावपळ सुरु होते. दारात हवाई सुंदर्या आपल्याला निरोप देण्यास हसर्या चेहर्याने उभ्या होत्या. त्याचा निरोप घेउन बाहेर पडलो आणि आमचा विमान प्रवास सुखकर होतो.
1 comment:
माझया पहिल्या विमान प्रवास मधे मी असाच अनुभव घेतला होता
Post a Comment