Tuesday, February 3, 2009

सरकारची अनास्था.

महाराष्ट्राच्या आदिवासी भागात नक्षलवादि चळवळ १९८० पासुन सुरु झाली व या मडंळीने आतापर्यत शभंरहुन अधिक पोलीसांची हत्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या राज्यात झालेल्या आहेत.तसेच या नक्षलवाद्दानी हिंसाचारांचा अवलंबनाने स्थानिकांही मारले आहेत.
नक्षलवाद्दीच्या प्राबल्य असलेल्या भागात सरकारी यत्रंणा व पोलीस येऊ नयेत व आदिवासी भागामघ्ये विकास होऊ नये यासाठी नेहमीच त्यानी दडपण टाकले आहे. प्रत्येक हत्त्येनतंर परिस्थीतीची पहाणी करुन नक्षलवाद्दाना चोख प्रत्युतर देण्याचा निर्धीर करुन त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी अत्याधुनिक यत्रंणा व शस्त्रे वापरण्याची ग्वाही देऊन राजकीय नेते विसरुन जातात.पुन्हा अशाच घटना घडल्यानतंर पुन्हा पाहण्या व आश्वासने असे आणखी किती दिवस चालणार? सरकार नक्षलवाद्दांचा कायमचा बंदोबस्त करु शकत नाही तर ते आतंरराष्ट्रीय दहशतवाद्दांच्या कारवाया कशा बंद करणार? सरकारच्या अनास्थेचे चित्र बदलण्याची अपेक्षा या पधंरा पोलीसांच्या बळीने या भागातील आदिवासी बाळ्गु शकतात का?

No comments: