Saturday, February 7, 2009

अर्थ प्रजासत्ताकाचा.




मित्रांनो,नुकताच आपण भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला.लोकशाहीच्या खर्या स्थापनेचे पुढ्चे हिरक महोत्सवी वर्ष असेल.गेल्या ६० वर्षात आपण लोकशाही किती पचवली याचा विचार केला तर फारसे आशादायक चित्र समोर येणार नाही असे खेदाने म्हणावे लागेल.भारतीय परंपरा एक राजा आणि बाकी प्रजा या पध्द्तीची होती.अजुनही जनता आणि राजकर्ते यांची मानसिकता बदलेली नसल्याचेच विदारक चित्र समोर येते.पुर्वी सम्राट आणि मांडलिक असत, त्यांची जागा आता फक्त गल्लीपासुन दिल्लीपर्यत पसरलेल्या तथाकथित कार्यसम्राटांनी घेतली आहे.त्यांचा थाटमाट आणि भाटवर्ग राजेरज़वाड्यांचीच आठवण क्ररुन देणारा आहे.नाममात्र लोकशाहीच्या नावाखाली अजुनही सरंजाशाहीच आपण अनुभवत आहोत.



गेल्या ६० वर्षातील भारतीय लोकशाहीचा आढावा घेतल्यास असे दिसते कि त्याचा खरा अर्थ अजुन कोणाला उमगलेला नसुन लोकनियुक्त सरकार म्हणजे लोकशाही असा आभास निर्माण झाला आहे.गेल्या काही वर्षात आपण एकही सक्षम व भक्क्म सरकार निवडुन देण्यात अपयशी ठरलो आहोत.मूळ इमारतीपेक्षा टेकूंनाच जास्त महत्व प्राप्त झाले आहे जे आपल्या उपद्रवमूल्याचा वापर करण्यात धन्यता मानत आहेत.भ्रटाचार हा एक सर्वमान्य नियम होऊन बसला आहे.ज्यात सामान्य जनता भरडुन निघत आहे. त्याचे समर्थन करताना आपण जागतिक परिणाम लावायला अजिबात कचरत नाही. इतर कोणत्याही बाबतीत भले आपण प्रगती केली नसली तरी या क्षेत्रात आपण अग्रेसर आहोत. लोकशाही म्हणजे खरे तर लोकांची,लोकांनी,लोकांसाठी चालविलेली एक सत्तापध्दती असते. परंतू आपल्याकडे मात्र ती काही मुठभर लोकांसाठी अनेक लोकांनी निर्माण केलेली एक कायमची सोय आहे.यातही,सत्ता कौंटुबिक वारसा हक्काने बिनबिभाट्पणे संक्रमित होत आहे.


मित्रांनो,लोकशाहीचा खरा अर्थ समजून घेऊन सर्वाना दाखविण्याची जबाबदारी सुजाण नागरिकत्वाच्या नात्याने युवावर्गावर येऊन पडली आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. उच्च शिक्षण घेण्यासाठी जी तळमळ आजचा तरूण दाखवतो तेवढी देशहिताची तळमळ परदेशात जाताना कोठे लोप पावते तेच कळत नाही. ब्रेन-ड्रेन ची समश्या इतक्या वर्षानंतरही तेवढीच गंभीर आहे.परदेशात जाऊन मिळवलेले प्रगत ग्यान आपल्या देशासाठी वापरण्यापेक्षा तेथील तथाकथित सुखासिनतेचा मोह प्रबळ ठरत आहे. एकदा का त्या सोनेरी पिंजर्यात माणूस अडकला कि परतीचे सर्व मार्ग स्वत:च्या हातांनी तो कधी बंद करतो ते कळतही नाही.एक नक्की आहे कि तेथल्या दुय्यम नागरिकत्वापेक्षा इथले काहीसे कमी गुणात्मकतेचे प्रथम नागरिकत्व प्रिय असलेच पाहीजे. अनेक स्वातंत्र्य सग्रामिंच्या बलिदानाने मिळालेल्या लोकशाहीचा हा वारसा टिकवून ठेऊन सम्र्ध्द्पणे पुढच्या पिढीकडे देण्यासाठी या देशातच राहवे. भारतीय जीवनमान इतर क्षेत्रात विकसित हित असताना लोकशाहीच्या पक्वते बाबतीत मात्र बाल्याअवस्थेतच आहे. याचे मुख्य कारण देशाविषयी बोथट बनत चाललेल्या आपल्या संवेदना जे काही कमी दर्जाचे आहे ते आपले अपयश व चांगले आहे ते इतरांचे यश पळपुट्या भुमिकेचा पुनर्विचार करावाच लागले. व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा ती बदलण्याचा निग्रह करणे खुप गरजेचे आहे.आपल्या विचारसरणीतील कमकुवतपणाच गैरव्यवहाराला बळ देतो.अनेक क्षेत्रात आघाडीवर असणार्या काही मोजक्या स्फूर्तिस्थानांचा पाठपुरावा सातत्याने केला तर हे चित्र बदलता येइल हे नक्की.


मित्रांनो, प्रजासत्ताकाचा खरा अर्थ जाणून घेऊन एका समंजस,सबळ व पारदर्शक लोकराज्याच्या निर्मीतीचा प्रयत्न करणार्या नागरिकाच्या मनात "देश माझा - मी देशाचा" ही भावना सतत जाग्रत राहो हीच प्रभुचरणी प्रार्थना !!

अनुकरणात आणणारा लेख....




1 comment:

Some Little Greens said...

Nice one. Definitely we need to do something. To start with, we must understand power of our Vote.