
कोथळीगडावर मित्रांसह गेलो होतो.
कर्जतपासून 'आंबवली' साठी बस पकडावी लागते. कर्जत मुरबाड बस जातात, आंबवली गांवातून पेठच्या किल्ल्याकडे आपण जाऊ शकतो. आंबिवली गावातून पेठच्या वाडीत जाण्यासाठी साधारण तास, सव्वातास लागतो घाटासारखी नागमोडी वाट असल्याने चांगलीच दमछाक होते.डोंगररांगेवरून पेठच्या वाडीत जाताना लांबूनच पेठचं दर्शन होतं. पाषाणात कोरलेल्या पायऱ्या, गुहा, तोफा, तळं आजूबाजूचा परीसर माथेरानचा डोंगर अगदी नजरेच्या टप्यात असल्याने इथून माथेरानलाही जाता येतं.

गुहेच्या तोंडाशीच एक वाट किल्ल्याच्या पोटातून कोरलेल्या पायर्यांकडे जाते.एकसंध दगडात आतून कोरलेल्या पायर्या हे या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ह्या पायर्यांमुळेच कोथळीगड हे नाव पडले आहे. या पायर्या आपल्याला किल्ल्याच्या टोकावर घेऊन जातात. गुहेच्या शेजारची वाट सुळक्याच्या पोटात कोरलेल्या पाय-यांनी गडमाथ्यावर जाते. गड चढताना अनेक ठिकाणी तुटलेल्या पायऱ्या दिसतात. तर गडाचा मुख्य दरवाजाही ढासळला आहे. त्याच्याबाजूच्या पाऊलवाटेने वर जाता येतं. थोडं उंचीवर येताच कातळात खोदलेल्या चार पायऱ्या दिसतात.

गुहेत भैरवनाथ आणि वज्रेश्वरी देवीचं मंदिर आहे.माथ्यावर एक छोटासा तलाव व काही पडक्या वाडय़ांचे अवशेष दिसून येतात.पेठचा किल्ला भीमाशंकर डोंगररांगेपासून वेगळा झालेला आहे.माथ्यावर भिमाशंकर तुंगी, माथेरान, पेब अशी डोंगर रांग न्याहळता येते.
किल्ल्याची अवस्था चागंली नाही.पाय-या,दरवाज्याच्या कमानी तुटल्या आहेत.गवत वाढलेले आहे.गुहेतील कोरीव खांब पडले आहेत.किल्ला जूना असल्याने अवशेष पडलेले दिसतात.परीस्थीती पाहुन वाईट वाटते.आपले सरकार पूरातन (वास्तू) किल्लेच्या डागडुजी का करत नाहीत? दुस-या राज्यात असे किल्ले असते तर त्यानी चांगल्या पध्दतीने देखभाल केली असती. स्थानिक लोकांना कामे जाऊन ही डागडुजी करण्यात यावी. इतिहासातील पुराव्याची जपणुक करावीच लागेल. स्थानिक नेत्यानी यासाठी प्रयत्न करावेत.
No comments:
Post a Comment