Thursday, October 8, 2009

अशी एक 'कल्पना'.

प्रेमळ,हलवी,सर्वावर प्रेम करणारी,सर्वाना हवीहवीशी वाटणारी सर्वाची आवडती अशी ही एक 'कल्पना'. सर्व भावंडात ही लहान असल्याने सर्वाची लाडकी. तिची मोठी बहिण तीची खास सखी.दोधींची खास दोस्ती, ऐकीमेकीशिवाय काहीच चालायचे नाही. बाबांवर तीचे खुपच प्रेम.अगदी कोठे लागेल तर 'आई ग' म्हणण्यापेक्षा 'बाबा' ना तीची पहीली हाक. मोठी झाल्यावर तीचे लग्न झाले.ती लग्नानतंर आनंदात व मजेत दिवस घालवित आपल्याच विश्वात रमली . मुलगा झाल्यावर ती सुखात तिधांच्या कुटुंबात.

केव्हातरी भेटायची तेव्हा मनमोकळे करुन बोलयची.

काही दिवसानी कळले,ती आजारी आहे तीचे पोटाचे आँप्रेशन झाले आहे.मी वेळ काढुन तीला भेटण्यास गेलो.आँप्रेशन मोठे होते.तिचे भाऊ व बहिणी तिच्या सेवेला तप्तर होते.शांत पडुन होती पण आजारी वाटत नव्ह्ती.जाग आल्यावर बघुन हसली.बोलण्याचा प्रयत्न करीत होती.आम्ही खुणेने शांत राहण्यास सांगितले. त्या आजारातून ती बरी होऊन परत घरी येऊन ससांरात रमली.

नेहमीच्या कामात दिवस आनंदात जात होत.खुशीत होती.

काही दिवसानतंर तीला दोन तीन वेळा हाँस्पिटल मघ्ये दाखल करुन तपासणी केली.पण तीचे दुखणे काही बरे हित नव्ह्ते. मोठ्या डाँक्टराने सर्व तपासण्या केल्यानतंर,त्यानी तीला 'कँन्सर' चा आजार झाला असल्याचे निनाद केले. पण या आजाराबद्दल तिला काहीच कळु दिले नाही. ही बातमी ऐकून सर्वाना धक्का बसला.आणि वाईट वाटले. तिचे कुटुंब कोसळले. भाऊ व बहिणी तीच्या मदतीला धावले. तिला या आजारातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सर्वानी तिला न कळविता सुरु केले. तिची तब्तेत खालावत होती. वेगवेगळे उपचार सुरु होते.तिला आराम पडावा म्हणुन जो कोणी नविन उपचार सांगेल तो तातडीने केला जात होता. तीचे आँफिसला जाणे बंद पडले.ती घरातच राहुन उपचार घेत ती बरे होण्याची वाट पाहत होती. तिच्या आजाराला तोडं देण्याची ताकद तीला कोठुन येत होती माहीत नाही. तिच्या आईला ती रोज फोन करुन तब्तेतीची माहीती देत असायची. मघ्ये आर्युवेदीक औषधे घेतली. केमो केल्या. पण तिच्या तब्तेतीत सुधारणा होत नव्ह्ती.
शेवटी आजार वाढत गेला आणि तिला हाँस्पिटल मघ्ये दाखल करावे लागले. तिच्या मदतीसाठी तिचे भाऊ व बहिणी हाँस्पिटल मघ्ये राहत होते. तिला तिच्या आजाराबद्दल माहीत नसले तरी जाणीव झाली होती.तिच्या वेदना तिला सहन करता येत नव्ह्ते.बेचैन असायची.सारखी रडत असायची.झोप येत नव्ह्ती. तिला आता मी बरी होणार नाही याची खात्री झाली होती. 'मला जगायचे आहे' , 'मला जगवा' असे तीचे म्हणणे आहे. तिला समजावणे कठीण जात होते. एक महिन्यापेक्षा जास्त ती हाँस्पिटलमघ्ये होती. आजार बळावत चालला होता.तिला होत असलेल्या वेदना पाहवत नव्ह्त्या.वेदनेने ती व्याकुळ होत होती. पण आपण तिला काहीच मदत करु शकत नव्ह्तो. तिला तिच्या मुलाची खुप काळजी होती. मुलाबद्द्ल सर्वाकडे बोलायची. मी कोणाचे काय वाईट केले होते की माझ्यामागे हा आजार लागला, असे म्हणत ती दु:ख व्यक्त करीत होती. तिला वेदना असह्य होऊ लागल्या. शेवटी शेवटी तर ती मला एखादा इंजेक्शन द्या ज्याने माझा शेवट होइल.आतामला ह्या वेदना सहन होत नाहीत.ती नतंर नतंर बोळु शकत नव्ह्ती.डोळे उधडु शकत नव्हती.वेदनेने ओरडायची. तिचे मरण आम्हाला पाहावे लागत आहे. तिचे वेदनेने तळ्मळने पाहण्यास जड जात होते. तरी आम्ही तीला जगण्याची उमेद देत होतो व तू बरी होशिल अशी आम्ही आशा दाखवत होतो.या इच्छाशक्ती वर ती दिवस दिवस काढत होती. शेवटी डाँक्टरनी तीला जगण्याची आशा दाखविणे बंद करण्याचा सल्ला दिला. तिचा शेवट लांबत आहे व तिला त्रास असह्य होत आहे. ती लवकर जाणे योग्य आहे. शेवटच्या दिवशी तिने सर्वाना जवळ थांबण्यास सांगितले होते.कालच्या सोमवारी या भयानक आजाराशी सामना करीत शेवटी तिचा शेवट झाला. सगळे जग स्तब्ध झाल्यासारखे वाटले.

मला माझ्या लहान मुलीचे मरण पाहावे लागले,असे तिच्या आईने दु:ख व्यक्त केले.

या 'कल्पने'ला ही माझी श्रद्धांजली.


(कोणलाही स्वत:च्या इच्छेनुसार स्वत:चे जीवन संपविण्याचा ह्क्क असावा ही कल्पना काही मडंळीनी जनतेसमोर मांडली त्याला खूप वर्षे लोटली.स्वत:च्या इच्छेनुसार जीवन संपवू पाहणार्या व्यक्तीला तशी सोय उपलब्ध करुन द्यावी लागेल.वेदनारहीत मृत्यु ही स्वेच्छामरणातील संकल्पना आहे या विचार व्हावा.)

No comments: