Friday, February 26, 2010

'अजि मराठीचा दिनु'

२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन' प्रत्येक मराठी माणसाने जल्लोषात साजरा केला पाहिजे.रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचाच करावा व मराठी भाषेचा सन्मान राखा.आपल्या घरातच मराठीला मान मिळाला पाहिजे.कोणतीही लाज न राखता आपल्या रोजच्या संभाषणात मराठीचा वापर करुन मराठी बोली वाढविली पाहिजे.
ब्लाँगवर मराठीत लिहिण्यास मिळल्याने खुपच आनंद झाला.
रोज नवनव्या ब्लाँगवर नोंदी कराव्यात.
प्रत्येक मराठी भाषिकाने मराठीसाठी जगले पाहीजे.
हार्दीक शुभेच्छा.








मराठी प्रतिज्ञा




मराठी ही माझी मातृभाषा आहे.
मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे.
माझ्या मायमराठीला मी सदैव मान देईन.
इतर सर्व भाषांचा, नेहमी आदर करीन.
त्या भाषा मायमराठीच्या, बहिणी आहेत.
जागतिक व राष्ट्रभाषा याबरोबरच मी मराठीचा देखील नेहमी वापर करीन.
मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
मराठी भाषेचे आद्य सारस्वत माऊली ज्ञानेश्वरांपासून सर्वच मला वंदनीय आहेत.
महाराष्ट्राचे महत्व मराठी भाषेच्या विकासातच आहे, याची मला जाणीव आहे.
मराठी भाषेची जडणघडण प्रादेशिक बोलींमधील विविधता व त्यातून निर्माण होणारी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.
मराठी भाषेच्या विकासार्थ जास्तीत जास्त निदोर्ष बोलेन, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
महाराष्ट्र माझा आणि मराठी माझी यांची सदैव आठवण ठेवीन.
मराठीच्या विकासातच माझा विकास आहे. म्हणूनच मी मराठीच्या विकासार्थ झटेन.
मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे.




जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद!



3 comments:

Anonymous said...

आपल्याला पण मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्या ॥

Anonymous said...

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

शब्द सितारे... said...

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्या.

remove your word verification on coment.