
कोकणातला हापुस आंबा जगप्रसिध्द आहे.आंबा खावा तर तो हापुसच.फळांचा राजा आणि राष्ट्रीय फळ म्हणून दर्जा असणा-या आंब्याचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. रसाळ, तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा आणि साखरेप्रमाणे गोड गर, टवटवीत पिवळसर आणि नारंगी रंग या वैशिष्ट्यांनी युक्त असणा-या आंब्याच्या झाडाला कधी मोहोर येतोय आणि तो चाखायला मिळतोय, अशी आतुरता सर्वांनाच लागलेली असते. बाजारात वेगवेगळ्या जातीचे भरपुर आंबा आले आहे पण हापुस सर्वाच्या पंसतीचा.
कोकणात एक वर्षाआड हापूस आंब्याचे उत्पन्न येते . एप्रिल - मेमध्ये कोकणात काही बागांमध्ये भरपूर आंबे दिसतात. महाराष्ट्रात मुख्यत: हापूस, पायरी आणि तोतापुरी आंब्याच्या जाती आढळतात. रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंबा विशेष प्रसिद्ध आहे. दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये आंब्याची ओळख झाली.आंब्याचं उत्पादन वर्षभर होत नाही, त्यामुळे त्याच्या ठरलेल्या मोसमामध्ये आंबा खाणं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.
मोहोर आल्यानंतर कैरी धरते. त्यानंतर साधारणपणे तीन महिन्यांनी खाण्यालायक आंबा तयार होतो. आंबे असे तयार होत असल्याची खूण म्हणजे झाडावरच्या काही आंब्यांचा रंग बदलू लागतो. याचा अर्थ आंब्याला पाड लागला आहे. असे पाडाला लागलेले आंबे उतरवायचे.पेंढ्याच्या आढीत घालायचे. आढीत घातल्यानंतर चारआठ दिवसांनी आंबे खायला तयार होतात.पण हा लांबलचक काळ बाजारपेठेसाठी 'त्रासदायक' ठरू लागला.कल्टार आणि मायक्रो न्युट्रिशियनसारखी रसायने लावून उत्पादित केलेले, कॅल्शियम कार्बाइड सारखे घातक रसायन टाकून कृत्रिमपणे पिकवलेल्या आंब्यांना ना चव असते ना अस्सल गोडवा. या वर्षी काही देशानी द्राक्षांचा दर्जा खालावल्यामुळे परत पाठवली आहे. आंबा शेतक-यांनी व व्यापा-यांनी याचा विचार करावा.रासयनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा वापर करून काढलेले आंब्याचे उत्पादन हे जास्त गुणवत्तापूर्ण आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीने दलालांना आवर घालून लिलाव पद्धत , मालाचा दर्जा ठरवून त्यानुसार योग्य भावात विक्री करून शेतक-यांना न्याय मिळवुन दिला पाहिजे.पण राज्य सरकारचा या दलालाना पाठिंबा असल्याने आताची हात बांधून मालाचे दर ठरवण्याची बेकायदा पद्धत केव्हा बंद होणार? शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी काही दलालांनी फळे सर्वसामान्य ग्राहकाला विकण्याऐवजी थेट कॅनिंग फॅक्ट-यांना माल विकण्यास सुरुवात केल्याने बाजारात आंब्याची अधिकच टंचाई निर्माण होते.
कोकणातल्या हापुस आंबा चांगलाच राहीला पाहिजे.
No comments:
Post a Comment