समुद्रांवर विजय मिळविणारे कमांडर दोंदे या मराठी माणसाच्या अचाट करणा-या पराक्रमाला सलाम. कमांडर दिलीप दोंदे यांनी एकट्यानेच सुमारे ४० हजार किमी स्वदेशी बनावटीच्या ‘ म्हादेई ’ या तब्बल २४ टन वजनाच्या अत्याधुनिक शिडाच्या बोटीतून एकटेच पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी मुंबई बंदरातून १९ ऑगस्ट २००९ रोजी निघाले होते.२७६ दिवसांची परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण करुन दोंदे पुन्हा एकदा मुंबई बंदरात दाखल होत असताना आयएनएस दिल्लीसह, आयएनएस म्हैसूर, आयएनएस प्रबल आणि नौदलाच्या अन्य जहाजांनी सलामी दिली.
भारतीय नौदलाच्या साहाय्याने ह्या समुद्रातून पृथ्वीप्रदक्षिणेचे आयोजन कमांडर दिलीप दोंदे केले होते.पण या वयात हा एवढा मोठा समुद्रातला प्रवास एकट्याने करण्याचा विचार करणे हेच मोठे घाडस होते. त्यांच्या ताकदीचा,क्षमतेचा व मानसिकतेचा हेवा वाटतो. तरुणाना लाजवेल असा त्याचा हा प्रराक्रम श्रेष्ट आहे. सागर परिक्रमा केलेले ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई ठरले आहेत.कोट्यवधींची लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात यापुर्वी एकाही व्यक्तीने अशी परिक्रमा का केली नाही, असा प्रश्न परदेशातील दर्यावदीनी दोंदे यांना विचारला होता.
आंतरराष्ट्रीय समुद्रात आपले महत्त्व टिकवण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची होती.अनेक आव्हांनाचा सामना करीत ही मोहीम त्यानी पूर्ण करुन दाखवून मराठी माणसाची मान उंचावली आहे.
2 comments:
अभिमानाची गोष्ट आहे.प्रत्येक भारतियाला अभिमान वाटावा अशी..
आपण योग्य ती नोंद घेउन हा लेख लिहीला ते बरे झाले नाहीतर अमिताभ आणि सचिन सोडून आपल्या देशांत कोणी पराक्रमी झाले होते हे नवीन पिढीला कळणारही नाही-दोष त्यांचा नाही तर अशी दक्षता माध्यमांकडून घेतली जात आहे.
मात्र एक आठवते-एका मराठी दांपत्याने(पाटील किंवा धर असे काही आडनाव होते त्यांचे)असा पराक्रम आधी केला आहे, असे वाचले आहे.माहीतगारांनी खुलासा करावा.
Post a Comment