Thursday, July 29, 2010

मुबंई विकणे आहे.

काही दिवसापूर्वी शिवडी येथे सिलेंडर मघुन वायुगळती झाली.त्या दिवसापासून राज्य सरकारने मुबंईतून गोदी हटविण्याच्या प्रयत्न सुरु केला. मुंबईतून गोदी हटवून तेथील शेकडो एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव काँग्रेस सरकारने माडंला आहे. वायुगळतीसारख्या घटनेचे निमित्त करून मुंबई बंदर मुंबईबाहेर हलविण्याचा प्रस्ताव बंदरविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केंदाला दिला आहे.मुबंईत सुधारणा व्हायला पाहिजेत पण जमीन बिल्डरांना दिल्यानतंर फक्त सुधारणा होते का?

गोदी हे मुंबईचे वैभव आहे.गोदी उभारल्यानतंर मुबंई शहर विकसित होत गेले आहे.आता मुबंईत विकास करण्यास जागा उरली नाही. गोदीची १८०० एकर जमीन वायुगळतीच्या घटनेचे निमित्त करून बिल्डरांना विक्रीसाठी खुली करून देण्याचे हे षडयंत्र आहे.काही संस्थांही अशा मागण्या करीत आहेत.तर राजकिय पक्षानी याला कडक विरोध दर्शवला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या सरकारी जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा उद्योग राज्य सरकारने चालवला असून यात ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी  ह्ल्लीच  विधानसभेत केला.
ऑफिसेस, उंची हॉटेल्स टॉवर्स वगैरे बांधण्यासाठी वांद्रे येथील सरकारी वसाहत विकण्यास काढली आहे.
रहिवाशी याला विरोध करीत आहेत.मुंबईतील अत्यंत मोक्याची ही जागा असून विमानतळ, पश्चिमेचा हायवे आणि पूर्वउपनगराला जोडणारा मार्ग या त्रिकोणात ही जागा असल्याने विकासकांना सुमारे ५००० कोटी रूपयांचा फायदा होईल असा अदांज आहे. रहिवाश्याना या राजकारण्यानी वर्षानुवर्षे गाजर दाखवली आणि मत मिळवली. शेवटी ही १०० एकर जमीन बिल्डर्रा च्या घशात घातली जात आहे. सरकारातील काही मंडळींचा या लोण्याच्या गोळयावर डोळा असल्याने मागील २५ वर्षापासूनची सरकारी कर्मचार्यांची मागणी नजरेआड करण्यात आली.या वसाहतीमधे ९९% लोक मराठी आहेत.
सर्वसामान्याला मुंबईतुन हद्दपार करणार्‍या आणि बिल्डरला ७५ टक्के फायदा मिळवून देणार्‍या ह्या प्रकल्पात कॉंगेस पक्ष केवढ्याला विकला गेला आहे.महाराष्ट्राच्या नेत्यांनी मुंबई शहर विकून स्वत:चा उखळ पांढरे करण्याचा उद्योग चालवला आहे. सर्व सामान्य जनतेच्या मुंबईत राहण्याचा अधिकार ते कायद्याचा आधार घेऊन हिरावून घेत आहेत.

सरकारच विमानतळ,रेल्वे,बदंर,रस्ते,मैदाने,समुद्र किनारे,ऐतिहासिक स्थळे विकण्यास लवकर काढणार का?

सरकारच्या मते विकासकाना जागा वाटणे हाच मुबंईचा विकास. राजकारण्यानी मुबंई विकायला काढली आहे.

2 comments:

Vijay Deshmukh said...

अगदि मनातलं बोललात ....

Anonymous said...

अतिषय समर्पक शीर्षक.
काकडे बिल्डर शरद पवारांशी संबंधीत आहे अशी जुनी माहिती होती. आणि इथे ज्या बिल्डर ला ही जागा मिळत आहे त्यात ३०% वाटा काकडे यांचा आहे असे वाचले. किती सरळ सरळ संबंध लागतो. राजकारणी पण उघड उघड मुंबई विकत आहेत. वाट लागणार मुंबईची.