Saturday, September 25, 2010

रांग.

मुंग्या   नेहमीच रांगेतून शिस्तित चालत असतात.एकामेकांच्या मागे जात असतात.समोरुन जाणा-या मुंगीला थांबून काहीतरी सांगत असतात.पण रांग सोडत नाहीत.
 रांग ही कल्पना   मुंग्याच्या  रांगेवरुन मानवाला  सुचलेली  दिसते.    मानवाच्या   आयुष्यात जन्मल्यापासुन अंतापर्यत रांग लावाली लागेत.आयुष्यात रांगेने पाठ सोडली नाही.कोठेही जा रांगेला पर्याय नाही.पण रांग असल्याने कामे शिस्तित व लवकर होतात. रांग पुढे-पुढे सरकते पण ती थांबली कि रांगेतील मडंळी गोधळ घालतात.पण रांग नसली की आनंद होतो.


भाविकांची रांग,तिकीटासाठी रांग,लिफ्टला रांग,वाहनांची रांग़,अंत्यदशर्नासाठी रांग,
लग्नासाठी रांग़,मुंग्याची रांग,भुकेल्या माणसांनी लावलेली रांग.मतदानासाठी रांग,
प्रवेशाकरिता लागणारी रांग,हिरव्यागार डोंगराची रांग,प्रवाशांची रांग,मंत्र्यांची रांग,
दिव्यांची एक रांग,कंपन्यांची रांग,ट्रेक़र्सची रांग,अबकडई ही शब्दांची रांग 


शाळेतच    रांगेचे महत्व     अंगिकारले जाते.     फाशीच्या शिक्षेसाठीही रांग लागली आहे.रांग न लावता घुसाघुशी केल्यास रांगेतील इतराना त्रास होतो.रांग मोडायची हिंमत न करता आपण कायद्याचं पालन करायलाच हवे. लागणा-या लांबच लांब रांग संपवण्यासाठी योजना आखल्या जातात.

" तुम्ही रांगेत उभे राहता. ती रांग फार हळूहळू सरकते आहे,हे तुमच्या फार उशिरा लक्षात येतं.तिस-या नंबरवर येईपर्यंत तुमचा निर्णय होतो आणि तुम्ही रांग सोडून शेजारच्या 'फास्ट' रांगेत जाता...


... तेव्हा तुमच्या लक्षात येतं की जी रांग सोडून तुम्ही इथे आलात,ती आता अतिशय वेगाने पुढे सरकते आहे आणि तुमची रांग मात्र रेंगाळली आहे...


... आता तुमचं लक्ष काऊंटरच्या वेळांकडे जाते,वेळ संपायला फक्त एक मिनिट राहिलेलं असतं आणि तुमचा नंबर येतो तेव्हा तुमच्या तोंडावर खिडकी खाडकन बंद होते! "


एकामेकांमागे उभे राहुन,पुढच्या पुढे गेल्यावर,पुढे जात जात आपले योजलेले काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी रांगेचा उपयोग होतो.रांगेचा फायदा सर्वानाच होतो.रंग नसेल तर मोठा गोधंळ उडतो व कामे होत नाहीत.रांगेतुन सर्वानाच संधी मिळते.म्हणुनच रांगेला महत्व आहे.

एखाद्द्या गाडीने रांग तोडली कि वाहतुक जाम होण्यास वेळ जात नाही.पण वाहने रांगेतून पुढे जात राहीली तर प्रवासास  थोडा उशिर होतो व प्रवास सुरक्षित पार पडतो.

 काहीना रांग लावणे कमीपणाचे वाटते म्हणुन ते इतर मार्गाने कामे करुन घेतात.आता रांगेशिवाय पर्याय नाही.एकाच रांगेतून सगळी कामे करता येत नाही.वेगवेगळ्या कामासाठी वेगवगेळ्या रांगा लावाव्या लागतात.रांगा लहानमोठ्या असतात.

लग्नसमारंभातल्या बुफे म्हणजे नंतर सॅलडसाठी रांग,आइस्क्रीमसाठी रांग,बनारसी पानासाठी रांग व शेवटी वधु-वरांना भेटण्यासाठी रांग तोपर्यंत तो पाहुणा अर्धमेला होतो.

मात्र बसची रांग असो वा देवळाची रांग, कोणतेही कष्ट न करता सगळीकडे आपलाच नंबर पहिला असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण थोडा विचार केल्यास, नेहमी आपणच रांगेतली पहिली व्यक्ती असणं शक्य नाही हे लक्षात येईल. तरीही आपण मात्र नेहमी धसमुसळेपणा, भांडण अशा गोष्टी करत असतो. रांगेत न उभे राहता शिस्त मोडणारे महाभाग बघून आपण तरी रांग का पाळावी, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण प्रत्येक जण असाच विचार करू लागला तर सगळीच कामं कठीण होऊन जातील. रांगेची शिस्त पाळली नाही, तर सर्वत्र माणसांचे लोंढे आणि गर्दी दिसेल. आपलं काम पहिलं करून घ्यायच्या घाईत सारं गैरसोयीचं आणि वेळखाऊ होईल. संयमाच्या अवलंबाने सर्वच गोष्टी सहज आणि शिस्तीत पार पडतील आणि सर्व समस्या सुटतील.

रांग (क्‍यू) ही गोष्ट माणसे शारीरिकदृष्ट्या कशी व कोठे उभी आहेत किंवा बसली आहेत, यावर तत्त्वतः अवलंबून नसते. "अगोदर येणार त्याला अगोदर मिळणार' हे तत्त्व पाळले जाणे म्हणजेच "रांग' पाळली जाणे. जेव्हा प्रत्यक्ष शारीरिकरीत्या रांग लावली जाते तेव्हा सतत उभे राहून आतापावेतो कमावलेला "प्रतीक्षाक्रम' सांभाळावा लागतो. कोणी घुसत नाहीना यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. विशेषतः पुढे पोचलेल्या "ओळखीच्या' व्यक्तीस आपले काम देणे हा घुसखोरीचा प्रकार लढण्यासाठी किचकट ठरतो. काही अपरिहार्य कारणांनी काही वेळापुरती रांग सोडावी लागली, तर आपल्या मागच्या व्यक्तींना आपण त्याच्या "पुढे' आहोत ही साक्ष देण्यासाठी पटवावे लागते. रांगेचा फायदा सर्वानाच होतो.


No comments: