गणपती विसर्जनानतंर पावसाळ्यातला शेवटच्या ट्रेकला जाण्याचे अगोदर ठरविले होते.पण कोठे जायचे ठरत नव्हते. शेवटी 'ड्यूक्स नोज'चा ट्रेक ठरला.मित्रांचा होक़ार आला.माझे मित्रपरीवार व माझ्या मुलाचा मित्रमडंळ असे सकाळी इंद्रायणीने निघालो.लोणावला येथे उतरुन कुरवंडे गांव गाठ्ले.प्रन्नस वातावरण होते. सर्व वातावरण स्वच्छ सुर्यप्रकाशात घुवून निघाले होते. रात्री पाउस पडुन गेल्याने हवेत गारवा होता.ओळख परेड झाल्यावर चहापाणी करुन चढण्यास सुरुवात केली.'शिवाजी आयएनएस'ला बाजुला ठेवून चढाई सुरु केली.
खंडाळा व लोणावळ्याचा मनाला सुखवणारा जो निसर्ग आहे. तो केवळ ट्रेकने चागंला एन्जॉय करायला मिळतो. गवतातून वाहणारा मोकळा उनाड वारा आपल्याला सगळं विसरायला लावणारा आहे. या दिवसात मूळचा राकट... कणखर असलेला सह्यादी मृदू... ओलसर होतो. 'ड्यूक्स नोज'चा सुळका न्याहाळताना ड्यूक ऑफ वेलिंग्टनची आठवण येते.इथल्या डोंगरकड्यांवरच्या टेकिंगचा अनुभव अविस्मरणीय असतो.लोणावळा-खंडाळ्याच्या द-याखो-यांचे सौंदर्य न्याहाळणं हा आगळा अनुभव असतो.
हिरवाई पाहण्यासारखी होती.काही पट्यात पिवळी फुले बहरली होती.हिरव्या रंगात मघ्ये मघ्ये पिवळी शेड दिसत होती. पुढे पुढे वेगवेगळी फुले पाह्ण्यास मिळाल्याने मन प्रन्नस झाले.त्या फुलाना हात न लावता कँमे-यात त्या फुलांच्या छ्ब्या उतरवुन घेतल्या.जसे काय 'व्हँली आँफ फ्लावर'चा नजरा पाहत होतो. वरती पोहचल्यावर उन्हे वाढल्याने गरम झाले.पण दरीतून घुके वर चढत होते.या धुक्याने फोटॉग्राँफीला अडचण होत होती.झाड्याच्या सावलीत बसुन गाणी झाली.आणलेला खाऊ खाल्ला.मंदीरात दर्शन घेऊन खाली उतरलो.
आता ढ्गाळ झाल्याने व वारा सुटल्याने थकवा दुर झाला. मग परतताना खंडाळा येथे जाण्याचे ठरले.
आजुबाजुचा परीसर न्याहळत मौजमस्ती करीत पुढचा पदभ्रमण सुरु होते. बाजुच्या डोगंराला वळसा घालुन खंडाळ्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.पावसाचा अभिषेक सुरु झाला. आम्ही मस्त भिजून घेतले.या मोसमातल्या पावसाचा निरोप घेऊन आम्ही खंडळ्याला उरतलो.
आजुबाजुचा परीसर न्याहळत मौजमस्ती करीत पुढचा पदभ्रमण सुरु होते. बाजुच्या डोगंराला वळसा घालुन खंडाळ्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.पावसाचा अभिषेक सुरु झाला. आम्ही मस्त भिजून घेतले.या मोसमातल्या पावसाचा निरोप घेऊन आम्ही खंडळ्याला उरतलो.
काही नवोदिताना ह्या ट्रेकचा अनुभव चागंला मिळाला.आम्ही मात्र पावसाळा व हिवळ्य़ाच्या मघ्यावरचा वातावरणाचा अनुभव घेत पुढच्या ट्रेकची आखणी करीत परतलो.




No comments:
Post a Comment