ज्येष्ठ नागरिकांना मान-सन्मान,आदर दिला पाहीजे. ज्येष्ठ नागरिक दिन ही संकल्पनाच मुळात किती छान आहे. खरं तर ज्येष्ठत्व मानण्या न मानण्यावरच असतं. आयुष्याचा मोठा अनुभव गाठी असलेल्या लोकांसाठीचा हा दिवस.
शरीरानी ज्येष्ठ पण मनाने तरुण राहुन उरलेले आयुष्य मजेत उपभोगणे हा संदेश या दिनी ज्येष्ठाना देणे योग्य ठरेल.पण त्याना आघाराची खरी गरज असते.आताच्या घावपळीच्या जीवनात तरुणाना आपल्या बुजुर्गाना वेळ व आघार देऊ शकत नाहीत.आजारानी त्रस्त झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीना आघाराची जास्त गरज आहे.यानी कोणाकडे पाहावे. कितीतरी ज्येष्ठाची मुले परदेशात नोकरीसाठी आहेत.त्यांचे तर खुपच हाल आहेत.आयुष्याच्या शेवटवेळी त्याना सर्वाची साथ लागते तीच त्याना मिळत नाही हेच त्यांचे दुर्दव्य आहे.मग त्यांना वृद्धाक्षमात जावे लागते.त्यातच आपला जोडीदार त्याला सोडुन अगोदरच गेला असेल तर त्याचे हाल होतात. आर्थिक मदत गरजेची आहेच पण त्याच बरोबरीने त्याना आधाराचा हात लागतोच.
ब-याचदा आपण म्हणजे घरात नको असलेली वस्तू,ही भावना खूप वेळा असते त्यांच्या मनात. ती आसपासच्या परिस्थितीमुळे, आपल्याच रक्ताच्या माणसांमुळे उद्भवलेली असते, हे खरं. पण त्यातही त्यांच्या मनाचा खेळ जास्त शारीरिक आधार हा भाग तर असतोच, पण त्याहीपेक्षा कैक पटींनी जास्त मानसिक आधाराची गरज या वयात जास्त असते.
उतरत्या वयात एखादा छंद त्यांनी जपायलाच हवी. त्यामुळे त्यांचा जगण्यात अर्थ असतो. आठवा तुमचे छंद आणि अजूनही जोपासायचा प्रयत्न करा. मला नक्की खात्री आहे, की आयुष्याच्या या टप्प्यातला प्रवासातही त्यांना एकदम सुखद होऊन जाईल.
काही वर्षांत एकाकी राहणा-या वृद्घांच्या हत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे.यासाठीही आजच्या पिढीला दोष देऊन चालणार नाही.थोडक्यात काय तर प्रत्येक पिढीत सगळ्या मनोवृत्तीची माणसं असतातच.
ज्येष्ठ नागरिकांची संख्या चालू शतकाच्या मध्याला एकूण लोकसंख्येच्या २१ टक्के होईल.या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था आपल्या परीने ज्येष्ठ नागरिकांच्या आथिर्क,आरोग्य,कुटुंब,समाजविषयक समस्या सोडविण्याचे प्रयत्न करत आहे आणि साक्षरता प्रसार, पर्यावरण, अंधशद्धा निर्मूलन, हुंडा, बालविवाहविरोध आदि समाज परिवर्तनाची कामे,रक्तदान,देहदान, व्यसनमुक्ती आयोजित करणे इत्यादी जनसेवेचे उपक्रम करीत आहे.
चैतन्यमयी वयोवर्धनाचे तुम्हीच आदर्श आहात व त्याचे अनुकरण करणे म्हणजेच ज्येष्ठधर्माच्या तत्त्वांचे आचरण करणे , हाच ' जागतिक वृद्ध दिना ' चा संदेश होऊ शकतो.
1 comment:
करंय तुमचं म्हणणं । पण एखादा छंद असला कि वेळ खूप छान जातो .
Post a Comment