Tuesday, February 15, 2011

देशातील शहरे निर्मल केव्हा होणार?

             मोठ्या शहरातून बाहेर पडताना व शिरताना नेहमीच कायम दिसणारी द्दशे कोणती असतील?     देशातील मोठ मोठ्या शहरातुन प्रवास करताना प्रातविधी बसलेली माणसे नेहमीच दिसतात. आपण काय ही द्दशे मुद्दामच पाहत नाही. पण नजरेत आल्यावर पाहावेच लागते.जगात असे प्रकार कोठेच पाहावयास मिळत नसतील.मग आपल्या देशात या प्रकाराबद्द्ल सरकार का काहीच करत नाहीत? 

                केंदाच्या निर्मल ग्राम योजनेत काटेकोर निकष लावत समिती पुरस्कार देतात.निर्मल ग्राम पुरस्कार योजना ग्रामीण भागात वरदान ठरत आहे.मग शहरांचे काय? 

              शहरांच्या नगरपालिकांच्या हद्दीत स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहेत तरीही माणसे असे का करतात? शहराच्या मेकओव्हरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या नगरपालिकांचे मुलभूत आरोग्य सुविधां पुरविण्याचे हे काम आहे. राज्यात सर्वत्र निर्मल ग्राम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत गावे निर्मल होऊ लागली आहेत.मग शहर निर्मल  योजना का राबवित नाहीत?ग्रामिण भागातील माणसे सुधारत आहेत.या योजनेला मोठे यश मिळत आहे.पण शहरातुन  परप्रांतिय झोपडपट्टीतून प्रस्थापित होतात तेच मग उधडयावर सर्व विधी उरकतात. जोपर्यत शहरातुन हे परप्रांतिय येणे  थांबणार नाही तोपर्यत आपल्याला या गल्लिच्छ प्रकारातून केव्हा सुटका होण्याची शक्यता आहे का?



No comments: