Wednesday, February 16, 2011

अपेक्षांचे ओझे आपल्या संघाला पेलवेल का?

     वर्ल्ड कपचे काउण्टडाउन आता सुरु झाले आहे.क्रिकेटचे हे महायुध्द म्हणुन ओळखल्या जाणा-या या स्पर्धेचे वातावरण तयार होउन क्रिकेट फिव्हर वाढत आहे.   

     वर्ल्ड कप क्रिकेट भारतीय उपखंडात होत असल्याने टीम इंडियावर अधिक दबाव असणार हे मान्य आहे.पण ह्या मोठ्या अपेक्षा पुर्ण करण्याची क्षमता आपल्या संघात आहे का? सकारात्मक पद्धतीने स्पर्घेला सामोरे गेल्यास अपेक्षा पुर्ण होतील का?  स्पर्घेला सामोरे जाताना खेळाडुनी अपेक्षांचा विचार करायलाच नको. आपल्या आयुष्यात आपण स्वत:कडून कमी आणि इतरांकडून जास्त अपेक्षा बाळगतो.

    वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांपासूनच भारतातल्या अफाट जनतेच्या अपेक्षांचे मोठे ओझे घेऊन आपले खेळाडु मैदानात उतरत आहेत.प्रत्येक सामन्यात या खेळाडुकडुन चागंल्या खेळाची अपेक्षा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाची ठेवली जाते.या एवढ्या मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याचे दडपण घेऊन नेहमीचे चागंला खेळ होण्याची शक्यता ठेवणे खेळाडुसाठी घातक आहे.'वर्ल्ड कप आपण जिकंणार'ही जाहीरात मिडियाने केल्याने  क्रिकेटरसिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.अपेक्षांचे ओझे घेऊन प्रत्येक सामना जिकंणे खेळांडुला शक्य नाही.संघाचे मनोबल अधिक उंचावण्यासाठी त्याकडुन मोठी अपेक्षा न करता त्याना त्याच्या गुणवत्तेनुसार खेळ करण्याची मुभा दिली पाहिजे. 

दडपणाखाली खेळाची उंची वाढवण्यासाठी व खेळांडुचे मनोबल उंचावण्याचे काम मिडियाने केले पाहिजे.खेळाडुना आपल्या कामगिरीत कायम सातत्य राखणे या अपेक्षांमुळे कठीण होत आहे. प्रत्येक खेळाडुला सुर गवसण्याची गरज असताना नविन वाद मिडियाने चव्हाट्यावर आणु नयेत. वर्ल्डकपच्या सामन्यासाठी भारतीय संघ मानसिकदृष्ट्या तयार होत असताना संघातील अंर्तगत वाद मिडियाने  प्रसिध्दी देउन कर्णधार व खेळांडुमघ्ये दुही करु नये.
'सचिनसाठी वर्ल्ड कप खेळाडुनी जिंकावा' तर काहीच्या मते 'सचिनने देशासाठी वर्ल्ड कप जिंकावा' असल्या वादाला मिडीयाने प्रसिध्दी देणे योग्य आहे का? अशाने खेळांडुमघ्ये वाद निर्माण होऊन त्यांच्या खेळावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

सा-या देशाचे लक्ष लागून राहिलेला क्रिकेट वर्ल्ड कप अवघ्या चार दिवसांवर आला आहे. भारतीय संघाने १९८३ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी आणि वर्ल्ड कप जिंकावा. 

ही जनतेची अपेक्षा व टीम इंडियाला शुभेच्छा .



 


No comments: