Friday, February 18, 2011

पद्म पुरस्कार जनमताने द्यावेत.

         दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केद्रं सरकार कडून पद्म पुरस्कार जाहीर करुन विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तीचा
सन्मान  केला जातो.सदोष निवडप्रक्रिया  व   पारदर्शकतेच्या   अभावामुळे  हे मानाचे पुरस्कार दरवर्षी वादाच्या
भोव-यात अडकतात.सरकार दरबारी वजन असलेल्याना हे पद्म पुरस्कार वाटण्याची प्रथा असल्याने सर्वसामान्यांच्या मनात असल्याने या निवडीबाबत प्रश्नचिन्हे आहेत.सामान्यजनांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व शोधुन पुरस्कार देण्यासाठी जनतेला या निवडप्रक्रियेत सामिल करुन घेतल्यास पारदर्शकता येईल व वाद होणार नाहीत.देशाचे सरकार जनतेने दिलेल्या मतदानावर स्थापन केले जाते.सिनेकलाकरांचे पुरस्कार व नविन आलेल्या रियालिटी शो मघील विजेते जनतेनी दिलेल्या मतांवर जाहीर होतात.सरकारने पद्म पुरस्कारासाठीची नांवे अगोदर सुचवावीत.त्याना इंटरनेट, एसएमएस व पत्रांच्या माघ्यमातून मते मागवून पद्म पुरस्कारांची निवड केल्यास जनतेला या पुरस्काराबद्दल आक्षेप राहणार नाही.ही मते नव्याने मिळणा-या युनिक आयडी नबंराच्या नोंदीने केल्यास आणखी पारदर्शकता व विश्वासार्हतता येईल.ज्याच्या आयुष्यातून व त्यांच्या कार्यातून लोकांनी प्रेरणा घ्यावीशी वाटले व त्याच्या कार्याचा सत्कार व्हावा वाटेल त्यालाच पद्म पुरस्कार मिळावे अशी जनतेची मागणी आहे.

मी दिलेली ही प्रतिक्रिया 'लोकमत'या वृतपत्रात १८.०२.२०११ रोजी प्रसिध्द झाली आहे

No comments: