Friday, February 25, 2011

मित्राचा चकोट

     हाँस्पिटलमघ्ये एक रुग्ण खुप दिवस उपचार घेत होता.खुप दिवस  हाँस्पिटलमघ्ये असल्याने तो  कंटाळला होता.एक दिवस त्याने मित्राला विनंती करुन  हाँस्पिटलच्या शोजारीच असलेल्या चित्रपटगृहामघ्ये  चित्रपट पाहण्यास जाण्याची इच्छा व्यक्त केली.त्या दोघांनी एक योजना आखली.त्यांच्या योजनेप्रमाणे मित्राचे कपडे घालुन रुग्ण चित्रपट पाहण्यास गेला व त्याचा मित्र रुग्णाचे कपडे घालुन गुपचुप झोपुन राहीला.

      काही  वेळेनतंर हाँस्पिटलचा  एक न्हावी,  चित्रपट बघायला  गेलेल्या रुग्णाच्या जागेवर झोपलेल्या  मित्राला
उठवूनु त्याला उद्या आँप्रेशन  असल्याने केस कापण्यास तयार होण्यास सांगितले.  त्या   न्हाव्याला   पाहुन मित्र
एकदम गोंघळुन गेला.'माझे कोणतेच आँप्रेशन  नसल्याने माझे  केस कापण्याची गरज  नाही'असे  तो न्हाव्याला
सांगु लागला.ज्या रुग्णाचे केस कापायचे आहेत तो नबंर हा तुमचाच आहे.त्याप्रमाणे मला तुमचेच केस कापायचे आहेत.त्यासाठी आपण तयार व्हावे.तो मित्र काही कारणे सांगुन केस कापण्याचे टाळण्यासाठी प्रयत्न करीत होता.पण तो न्हावी ऐकत  नव्हता.मला माझे काम पूर्ण करु द्या नाहीतर मी माझे काम न केल्याबद्द्ल माझा रीपोर्ट 
होईल.वाद वाढत होता.हा वाद सिस्टर कडे गेल्यास त्याना रुग्ण जागेवर  नसल्याचे निर्दशनास येईल याची भिती त्या मित्राला वाटु लागली. रुग्ण जागेवर नसुन भलताच माणुस रुग्ण बनलेला पाहुन वाँर्डमघ्ये मोठा गोंधळ होईल या भितीने तो मित्र खुप  धाबरला. केस कापण्याशिवाय पर्याय नसल्याने तो गुपचुप केस कापण्यास तयार झाला.न्हावी पटकन चकोट करुन निघुन गेला. शेजारचे पेशन्ट त्याच्याकडे पाहत हसत होते.
बाजुच्या पेशन्टना पाहुन तो शांतपणे अंगावर घेउन झोपुन राहीला. 
 
           काहीवेळाने चित्रपट पाहण्यास गेलेला रुग्ण लपतछ्पत वार्डमघ्ये  आला.आपल्या जागेवर आल्यावर त्याने  मित्राला उठविले व मित्राकडे पाहुन त्याला काहीच कळले नाही.त्याला हसायला येते होते पण मित्राकडे पाहुन   त्याची  दयाही येत होती.  मित्राने त्याला  घडलेली सर्व घटना सांगितली.मित्र ख-या मैत्रीला जागला होता.

सिस्टरला हा प्रकार कळल्यावर थोडा गोधंळ झाला पण रुग्णानी माफी मागितल्याने वाँर्डमघ्ये शांतता झाली. या मजेत मित्राचा चागंलाच फायदा झाला. त्याला नको असलेला चकोट फुक़टमघ्ये करुन मिळाला.

1 comment:

Some Little Greens said...

hech jarr operation karayche aste tarr ?