Thursday, March 10, 2011

काँपी

     संगणक क्षेत्रात 'काँपी' ही महत्वाची संज्ञा ,सारखी वापरली जाते.डेटा एका फाईल मघुन काँपी करुन दुस-या फाईलमघ्ये पेस्ट करुन घेता येतो.काँपी ही सोय नसती तर कामे खुप वाढ्ली असती म्हणुनच ही सोय खुप गरजेची आहे.हे काँपी करण्याचे काम संगणकाच्या माउस किंवा बटनाच्या सहाय्याने काही क्षणात करता येते.'काँपी-पेस्ट' हे नेहमीचेच काम असते व ते करावेच लागते.संगणकात काँपी बिनधास्त करता येते पण विद्यार्थी परिक्षेत काँपी करतात तो गुन्हा होतो.   
परीक्षेतील मार्क्स हा प्रतिष्ठेचा विषय झाल्यामुळे चांगले मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यासात कमकुवत विद्यार्थी काँपी करताना दिसतात.कॉपी हा प्रकार बहुतेकदा शाळेच्या 'होमपीचवरच' सुरू होतो.शाळेत पुढे-मागे आपल्याच वर्गातील मुले असल्याने 'परस्पर सहकार्यातून'कॉपीला सुरुवात होते.एकदा धीर आला की कुठल्याही परीक्षेत कॉपी करता येईल असा 'आत्मविश्वास' मुलांना येऊ लागतो.'विद्यार्थ्यांच्या मनात काही मार्कांसाठी कॉपी करण्याचे प्रलोभन जागृत होते. कधी जास्त मार्क्सपायी तर कधी मोहापायी हा काँपीचा मार्ग चोखाळला जातो. ही झाली मुलांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या कॉपीची कथा, पण सामूहिक कॉपी ही चिंतेची बाब आहे.आपल्या मुलाने पास व्हावे यासाठी शाळा,मुख्याध्यापक,परीक्षा केंदांवरील पर्यवेक्षक यांच्यावर दबाव आणून सामूहिक कॉपी करण्यास अधिकृतपणा आणला जातो. शाळेतील,गावातील दहावी बारावीचा निकाल शंभर टक्के लागावा यासाठी हा सगळा आटापिटा शाळा अशी सामुहिक काँपीला पुढाकार घेतात.

मुंबई विभाग हा सर्वात कमी कॉपी झालेला विभाग म्हणून घोषित केला गेला. तर मराठवाडा विभागात सर्वाधिक कॉपी झाल्याचे नमूद करण्यात आले.यावर्षी बारावीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात जवळपास १०० विद्यार्थ्यांना कॉपी किंवा तत्सम प्रकार करताना पकडण्यात आले. सामूहिक कॉपीला आळा घालण्यासाठी गावातील लोकांना एकत्र घेऊन लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांनाही या मोहिमेत सामावून घेण्यात आले.

पण काँपी या गैरमार्गापासून विद्यार्थ्यांना रोखण्याचे काम पालक आणि समाज करू शकतो.

बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार करताना पकडले गेले असता त्या विद्यार्थ्याला त्या किंवा त्यापुढील परीक्षेला मुकावे लागते. जर प्रकार गंभीर असेल तर त्यानुसार शिक्षा सुनावली जाते. या चुकीनंतर घर, समाजाकडून मिळणा-या वागणुकीची कल्पनाच न केलेली बरी. यापासून शक्य तितके काँपी कएण्यापासून दूर राहणे व येत असेल तितके पेपरमध्ये लिहून परीक्षा केंदाबाहेर ताठ मानेने बाहेर पडणे कधीही चांगले.काँपी हा गुन्हा न करणे हेच योग्य.






No comments: