Tuesday, March 15, 2011

घरटे चिमणीचे


                चिमणीची ओळख आपल्याला लहानपणीच होते.'चिऊ चिऊ ताई दार उघड' ही गोष्ट आजी किंवा  आईकडुन ऐकलेली असते.तेव्हापासूनच या छोट्याशा पक्षाशी आपली जवळीक साधते.नेहमीच दिसणारी ती चिमणी आणि तीची चिवचिव प्रत्येकाला परिचीत असल्याने ती आपल्या परिवाराची एक सदश्य बनलेली आहे.खिडकीत दिसली की तीला खायाला दिले जाते.ती पण चिव चिव करीत खाऊ घेऊन उडुन जाते.

        आमच्या किचनमघल्या खिडक़ीच्या वरच्या भागात त्या चिमणीने घरटे घालण्याची योजना आखलेली दिसली.ती लगेच कामाला लागली.तीच्या सोबतीला तीचा चिमणा होताच.दोघानी गवत जमवायला सुरुवात केली.गवत आणुन ते खिडकीच्या कोप-यात खुपसुन घरटे लावण्याची घावपळ सुरु केली.




त्यांच्याशिवाय दुसरा कोणत्याही पक्ष्यापासून व शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आमची खिडक़ी त्याना सुरक्षित वाटल्याने दोघंही मिळून चिव चिव करीत घरटे बनवायच्या कामाला लागतात.हिरवीगार गवतपात आणायचे काम चिमणा आणि घरटे बनवण्याचे काम मात्र चिमणीचे असते.त्या दोघांचे घरटे बांधण्यास त्यांच्याकडुन अथम परीश्रम घेतले जात होते.

ते बाधंलेले घरटे नेमके आमच्या गँसच्या वर आला होता.घरट्यातून कचरा खाली पडु लागला.ते घरटे काढुन टाकण्यासाठी घरातल्यांची ओरड सुरु झाली.मी यांच्याकडे लक्ष दिले नाही पण कचरा जास्त पडु लागल्यावर सर्वानी मिळुन घरटे काढण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या पक्षांनी घरट्यासाठी केलेली घावपळ आम्ही अनुभवली होती.त्यामुळे  वाईट वाटत होते.तरीपण पुढ्च्या अडचणींचा विचार करुन चिमणाचिमणी घरट्यात नसताना मी ते घरटे काढले. बाधंलेले घरटे जाग्यावर नसल्याचे पाहुन त्या दोघानी खुप चिवचिवाट केला. जसे काय आम्हाला शिव्याच घतल्या.

      त्याचा दोघांच्या चिवचिवाट पाहुन एखाद्या माणसाचे घर वादळात पडल्यानतंरची परीस्थीती होते तशीच त्यांची झाली असे होती.आम्हाला खुप वाईट वाटले.थोडयावेळाने दोघेही शांत झाले.आम्ही पुन्हा येथेच घरटे बांधु असे त्यानी पुन्हा चिवचिवाट करीत सांगितले.

        चिमण्यांच्या शिव्या खाण्यापेक्षा त्याना पुन्हा येथे घरटे करण्यास द्यायचे नाही असे आम्ही ठरविले.  दोन तीन दिवसानतंर चाचपणी करुन दोघांनी पुन्हा घरट्याचे काम सुरु झाले.गवत आणुन टाकल्याबरोबर ते आम्ही काढुन टाकु लागलो.ती दोघे काही थकत नव्हती.रोज आम्ही संघ्याकाळी गवत काढत होतो.
  
         दोन दिवसासाठी आम्ही बाहेरगांवी गेलो.हीच संघी साधुन त्यानी त्यांचे घरटे पुर्ण बांधले.घरी येऊन पाहिले तर यांचे घरटे तयार झालेले व खाली खुपसा कचराही पडलेला होता.चिमणी घरट्यात जशी हलायची तसा खाली कचरा जेवणात पडत होता.त्याचा जास्त त्रास होत होता.

            आता काय करायचे असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहीला.जसे तुम्ही एकेक वीट लावुन घर बांधता त्याचप्रमाणे आम्ही दोघानी एकेक गवताची काडी जमवीत हे आमचे घरटे बांधण्यात यशस्वी झाली असे चिमणी घ्ररट्यात बसुन चिवचिव करीत आम्हाला हिनवत होती.दोघेही जिकंल्याच्या अर्विभावात नाचत होती.

        पुढे जाऊन पिल्ले झाल्यानतंरच्या त्रासाचा विचार करीत ते घरटे काढुन एका खोक़्यात सुरक्षित टेरेसमघ्ये आडोशाला नेऊन ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.बोटाएवढ्या छोट्याशा जिवाने कष्टाने बांधलेल्या घरोंद्याचे नासघुस करायला जिवावर आले होते.पण त्याशिवाय गत्यंतर नव्ह्ते.म्हणुनच मी त्याची माफी मागुन ती दोघेही घरट्यात नसताना ते घरटे एका खोक्यात ठेवून टेरेसमघ्ये नेऊन ठेवले.थोड्याच वेळात ती दोघे उडत उडत आली आणि घरटे शोधू लागले.घरटे जाग्यावर नाही हे कळल्यावर दोघेही हरल्याने हताश होऊन चिवचिवाट न करता कोप-यात शांत बसले.त्याना पाहुन खुप वाईट वाटेल.त्यांच्याकडे पाहण्यास हिमंत होत नव्हती.अपराध केल्यास जाणीव झाली.त्यांचे घरटे सुरक्षित आहे हे आम्ही त्याना कसे सांगू शकणार हा प्रश्न सोडावण्याच प्रयत्न करीत होतो.शेवटपर्यत त्याना त्याचे टेरेसमघ्ये ठेवलेले घरटे काही मिळाले नाही.त्यानी पुन्हा तेथे घरटे बांधु नये म्हणुन तेथे पुठ्ठा लावुन त्याचा मार्ग बंद केला. तेव्हापासून ती चिमणाचिमणी पुन्हा घराच्या खिडकीवर दिसली नाहीत.











No comments: