Wednesday, March 16, 2011

मोलकरीन

मालकीन   :  काय ग ...तीन दिवसांपासून कामाला आली नाहीस,तेही न सांगता?
मोलकरीन :  ओ मँडम, फेसबुकवर status update करुन गेले होते की मी "गांवाला जाते" म्हणुन.
आपल्या साहेबांनी comment पण दिली की "come soon...Miss U!!"  
वरच्या साहेबांनी तर can't live without U अशी comment टाकली आहे.
खालच्या  साहेबांनी  तर  'गांवाचा पत्ता दे मी न्यायला येतो'  अशी comment दिली आहे.













कामाच्या निमित्ताने आपण आपले कुटुंबिय किंवा मित्र यांच्यापासून दुरावतो. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी काहितरी माध्यम असावे यावर विचार सुरू असतानाच ही संकल्पना समोर आली. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या जुन्या मित्रांना तसेच लांबच्या कुटुंबियांशी पाहिजे तेव्हा संपर्क साधू शकतो. तसेच आपण आपले फोटोही येथे फोटोसह अनेक गोष्टी शेअर करू शकतो आणि दुस-यांच्या अपडेट्सवर कमेन्टही देऊ शकतो ही संकल्पना क्लिक झाली 
आणि सोशल नेटवर्किंग वेबसाइटस् जन्माला आल्या.


सोशल नेटवर्किंग साइटमुळे प्रत्येकाला जगासमोर व्यक्त होण्याचे माध्यम मिळाले. यामुळे विविध प्रकरणांवर जागतिक पातळीवर चर्चा होऊ लागल्या. यावर परखड मते समोर येऊ लागली. हे पाहता भविष्यात सामाजिक मुद्द्यांवर सोशल नेटवर्किंग साइट्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. 


हल्ली सोशल साईटचा वापर खुप होत आहे.तरुण मडंळीतर फेसबूक शिवाय बोलत नाहीत.चोवीस तास फेसबुकवर आँनलाईन राहुन चँट सुरु असते.सगळे सण,डेज,वाढदिवस,'इमोशनल' इव्हेण्ट फेसबुकवर साजरे होतात.  गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्ड, प्रपोज, गिफ्ट्स, स्पॉट्स अशा मेसेजेसना कायम सुरु असतात.तसेच 'सेव्ह टायगर' मोहिमेत सहभागी हेच युथ होताना दिसतात.

No comments: