Thursday, March 17, 2011

चहापान

              आपले चहापान रोजच असते.कधी घरी तर कधी मित्रांसह हाँटेलमघ्ये.पण काहीचे चहापान विशेष असते.सर्वाना चहाचे आमंत्रण मिळते.सर्वजण चहापानाला जमतात.विरोधक चहापानावर बहिष्कार टाकतात. सर्वाचे चहा पितानाचे फोटो काढले जातात व मिडियावाले ह्या चहापानाला प्रसिध्दि देतात.

            राज्य सरकारचे मुख्यमंत्री नेहमीच कामकाज करताना चर्चेच्या वेळेस सर्वासह चहा पित असतात तरी देखील जनतेच्या पैशानी सर्व पक्षांसाठी चहापानाचा विशेश कार्यक्रम का आखला जातो? सत्ताधारी मंत्री मजेत चहा पित आपली एकमेकांवर किती मैत्री आहे ते चहा पिताना दात दाखवून हसल्याने कळते. इतर जनतेच्या मुख्य विषयांवर संमती दाखवतात पण हे विरोधक नेहमीच चहापानावर बहिष्कार का करतात?बहिष्कार टाकून काय सिध्द केले जाते? हा चहापानाचा फार्स कशासाठी?  
                 जनतेच्या पैशावर हा चहापानाचा कार्यक्रम आखला जातो तर दारुपानाचा कार्यक्रम आखणी केली तरी कोणीच या कार्यक्रामावर बहिष्कार टाकणार नाहीत.मोठ्या तारांकीत हाँटेलमघ्ये दारुपान आयोजीत केल्यास नेत्याची मजा घेता येईल. मिडीयालाही चमचमीत बातम्या व झिंगलेले फोटो प्रसिध्दीसाठी मिळतील.

 या चहाच्या प्याल्यात मोठे राजकारण दडलेले असते.

चहाला गेलोतरी अडचण नाही गेलोतरी अडचण 
चहाला बोलावले तरी अडचण नाही बोलावले तरी अडचण

आपल्या गोटात कितीजण आहेत याची चाचपणी करता येते
आपण त्याच्या गोटात आहोत ते भासवण्यासाठी चहाला हजेरी लावता येते.
चहापानानतंर तर्कविर्तक लावले जातात व नविन योजना आखल्या जातात.

तेथे जायचे की नाही याबाबत प्रत्येक नेत्याला विचारपुर्वक ठरवावे लागते.  
विरोधकांचे चहापानाला उपस्थित राहणे ही एकप्रकारे वरवरची साखरपेरणी असल्याने नतंर स्पष्ट होते.
कोणी कोणाकडे चहापानास जावे हा चहा पाजणा-याचा व पिणा-याचा विषय.
चहा पाजा किंवा आणखी काही पाजा. 

पण राजकारणात पिणा-यांपेक्षा पाजणा-यांच्याच झोकांड्या जास्त जात असतात.   

 
          मानवतावादी दृष्टिकोनातून ‘मित्रपक्षा’ ने त्यांच्या मित्रास चहापानास बोलावले जाते. त्यामुळे म्हणे चहाच्या पेल्यातील वादळ निर्माण झाले. चहा पिऊन वादळे निर्माण करण्याचे दिवस आता संपले आहेत. पण मित्रपक्ष हे सावधान व शुचिर्भूत,संस्कृतीरक्षक वगैरे असल्याने त्यांनी बहुधा बाटलीतूनच पाहुण्यांना चहा पाजला व त्या चहापानाने वादळ उठले. हे चहापान म्हणजे राजकीय ‘झिंग’ नसून फक्त मानवतावादच.
  
             मध्यंतरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रदेश भाजप कार्यालयात येऊन चहापान केल्याने तर युतीमध्ये मोठा भडका उडाला होता.भ्रष्ट मंत्र्यांबरोबर चहापान करणार नसल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी सांगितले होते.

             या अडचणीच्या चहापानाला जाण्यापेक्षा आपले कुटुबियांसह केलेले चहापान केव्हाही योग्य.


 

No comments: