Friday, March 25, 2011

युवराजचा आवेश

वर्ल्ड कपमघली उपउपांत्य फेरीतील सामन्यात टीम इंडियाने गुरुवारी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक लढतीत विकेट्स राखून धूळ चारली.या सामन्यात भारतीय खेळांडुनी आपल्या क्षमतेप्रमाणे खेळ केल्याने हा विजय मिळाला आहे.ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधील घोडदौड भारताने रोखली.यावेळी पूर्ण टीमचे विजयासाठी योगदान लाभले.

      तरीही युवराजने गोलंदाजी करताना दोन बळी घेउन अल्फातुन खेळी केली.फलंदाजी करताना तो खेळण्यास
आला तेव्हा आपली परीस्थिती चागंली नव्हती.तेव्हा युवराज एका बाजुनी गडी बाद होत असताना ऑस्ट्रेलियाच्या तोफखान्यासमोर डोके शांत ठेवुन खेळाला व शेवटच्या चेडुंवर चौकार ठोकून भारताला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मोठ्या दिमाखात आणले.शेवटच्या दहा षटकात त्याने जो खेळ केला तो पाहण्यासारखा होता.आपल्या खेळाची सर्व सुत्रे आपल्या हातामघ्ये घेऊन त्याने जो खेळ केला तो अविस्मरणीय होता.तेज गोलंदाज सामना आपल्या हातातून सुटत चालला आहे हे कळल्यावर तो त्वेषाने गोलंदाजी करीत होते.त्याना निघड्या छातीने सामोरे जात सामाना जिकंला तेव्हा त्याने जो आवेश दाखवला तो पाहताना भारताच्या एका सैनिकानी लढाई जिंकल्याचा आवेश त्याच्या डोळ्यात व हावभावात दिसते होते.त्याने जो आरोळी ठोकली व रैनाला मिठ्ठी मारली ते पाहाताना उर भरुन आला.तो क्षण  कायम आठवणीत राहील. याच आवेशाने संघाला विश्वचषक जिंकण्याची ईषा मिळाली.



No comments: