प्रिय ब्लॉग माझा-३ विजेते ब्लॉगर्स,
कळवण्यास आनंद वाटतो की, आपल्या ब्लॉग माझा-३च्या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम ऑन एअर जाण्यास सज्ज झालाय. येत्या रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.
वस्तुत: आपल्या स्पर्धेत ३६ ब्लॉगर्स विजेते ठरले. मात्र, कौतुक सोहळ्याच्या रेकॉर्डिंगसाठी त्यातील २४ ब्लॉगर्सच उपस्थित राहिले.
त्यामुळे हा सोहळा तुमच्या एवढ्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ऑन एअर जात असताना, कार्यक्रमाला येऊ न शकलेल्या ब्लॉगर्सची या एपिसोडमधील अनुपस्थिती मला पुन्हा जाणवत आहे. अर्थात त्यांनी आपल्या अन्य विजेत्या ब्लॉगर्सच्या आनंदात सहभागी होण्यासाठी हा कार्यक्रम जरूर पाहावा.
आपल्यातील स्नेहामुळे आणखी एक विनंती करतोय- मी सर्व ब्लॉगर्सना ही बातमी कळवतोच आहे. शिवाय, आपणही आपल्या माध्यमातून विजेत्या आणि अन्य ब्लॉगर्सना ही गोड बातमी नक्की द्या.
आपल्याला या एपिसोडसाठी जी वाट पाहावी लागली आणि जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल मी आपल्यातील प्रत्येकाची वैयक्तिक क्षमा मागतोय.
आशा आहे, पुढील 'ब्लॉग माझा' स्पर्धेलाही आपण असाच भरपूर प्रतिसाद द्याल......
आपला,
प्रसन्न जोशी
प्रोड्युसर-अँकर, स्टार माझा
विशेष नोंद- एपिसोड शूटसाठी येऊ न शकलेल्या ब्लॉगर्सना कुरियरद्वारे त्यांचे प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment