Monday, March 28, 2011

मैत्रीची गरज नव्हती.

  विश्वचषक क्रिकटस्पर्धेतील मोहालीत ३० मार्चला होणा-या भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या लढतीकडे सा-या जगाचे लक्ष लागले आहे.या उपांत्य फेरीतील सामन्याला जणू युद्धाचेच स्वरुप प्राप्त झाले आहे.पंतप्रधान मनमोहन सिंह हे स्वतः या मॅचसाठी मोहालीत उपस्थित राहणार असून पाकचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनीही या मॅचचा आनंद लुटण्यासाठी व मैत्रीसाठी यावे असे आमंत्रण त्यांनी दिले होते.क्रिकेटच्या मैदानावरची ही लढाई पाहण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे आमंत्रण पाकच्या पंतप्रधानांनी स्वीकारले आहे.

     २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची क्रिकेट संघ पहिल्यांदाच भारतामध्ये येऊन खेळणार आहे. या ह्ल्ल्यात दहशतवादी 'कसाब'ला पकडण्यात आपल्याला  यश आले. त्याच्या  चौकशीत हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे देउनही त्यानी हा आरोप केव्हाच स्विकारला नाही.त्या दहशतवादी हल्ल्यात आपले अधिकारी त्यानी  मारले होते.त्यांच्या शौर्याला आपण विसरलो आहोत.त्यानी आपल्या संरक्षणासाठी स्वत:चा जिव देशासाठी अर्पण केला ते ही आपण विसरलो आहोत. त्या देशासह आपण मैत्रीचा हात पुढे करीत आहोत यामुळे अतिरेकी कारवाया थांबणार आहेत का? याची शाश्वती पाकिस्तान देईल का? संसदेवर हल्ला झाला. मुंबई - दिल्लीत बॉम्बस्फोट झाले. कारगिलचे युद्ध झाले. कसाब व त्याच्या टोळीने मुंबईत घुसून हल्ला केला. त्यात २० पोलीस अधिकारी शहीद झाले व २००च्या वर निरपराधी मारले गेले.आणि आमचे नेते त्यांच्यासह क्रिकेटचे सामने पाहणार आहेत? जनतेने याला विरोध केला पाहिजे. त्या ह्ल्ल्यापासुन पाकिस्तानाने कधीही मैत्रासाठी हात पुढे केला नव्हता.मग आपणच का मैत्रीसाठी त्याना आमंत्रण देउन शातंता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न का करीत आहोत?मैत्रीसाठी दोन्हीकडुन प्रयत्न झाले पाहिजेत.

आपले सरकार घोटाळे व गैरव्यवहारांपासुन सुटका मिळण्यासाठी जनतेला व विरोधकाना नविन विषयाकडे वळवत आहेत का? पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे आमंत्रण म्हणजे शांततेसाठीचा षटकार असल्याचे सांगत पाकिस्तानी मीडियाने त्यांचे कौतुक केले आहे.तीच मिडिया 'आपण बुलाया इसिलिए हम आये'असे बोलण्यास तयार असेल. पुढच्या चर्चेसाठी त्यातून पाया रचला जाईल व पाकिस्तान चर्चेला तयार होईल अशी आशा आपल्या सरकारला वाटते.पण त्यांच्याकडुन अपेक्षा वाटत नाही.या सामन्याच्या निकालावर मैत्री व चर्चा हे बहुतेक ठरवले जाईल.म्हणुनच आपल्याला या मैत्रीची गरज नव्हती.

3 comments:

राजेंद्र अहिरे said...

या आपल्या लोकांनी असे डोक्यावर बसवल्यामुळेच माजले आहेत ते साले.

राजेंद्र अहिरे said...

या आपल्या लोकांनी असे डोक्यावर बसवल्यामुळेच माजले आहेत ते साले.

सर्वश्रृत... said...

आजकाल भारताला existential problem for pakistan असे संबोधणारे ज.प.मुशर्रफ तेव्हा (स्वतः राष्ठ्राध्यक्ष असताना) भारतात यायला मिळावे आणि चर्चा व्हावी म्हणून लोटांगणासापेक्ष वागले होते ते विसरलात का?