Friday, July 22, 2011

वाढती लोकसंख्या

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस संपूर्ण जगाची लोकसंख्या ७ अब्जांवर जाऊन पोहोचेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीनशी स्पर्धा करणा-या भारताची लोक संख्या आता १ अब्ज २१ कोटी झाली आहे. गेल्या दहा वर्षांत देशाच्या लोकसंख्येत १७.६ टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी लोकसंख्यावाढीचं प्रमाण आधीच्या तुलनेत घटल्याचं दिलासादायक चित्र समोर आलंय. भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या १७ टक्के इतकी आहे.

२००१ ते २०११ या दहा वर्षांत भारतीय लोकसंख्येत १८ कोटींची वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या जनगणनेत लोकसंख्यावाढीचा दर २१ टक्के होता, तो आता १७ टक्क्यांवर आला आहे.लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेलं उत्तर प्रदेश आणि दुस-या क्रमांकावरील महाराष्ट्र यांच्या लोकसंख्येची बेरीज अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे.

भारताकडे १३५७.९० लाख चौरस किलोमीटर जमीन आहे. जगाच्या भूभागाच्या ती २.४ टक्के आहे. तरी जगातल्या १६.७ टक्के लोकसंख्येचा भार आपण वाहतो आहोत.पाच वर्षांत भारताच्या लोकसंख्यावाढीचा दर १.४ टक्के आहे. याचा अर्थ दरवषीर् जवळपास १.७० कोटी लोकांची भर पडते. या वेगाने २०५० साली भारत १६१ कोटींपेक्षाही अधिक लोकसंख्येचा होईल. तेव्हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत असेल, कारण चीनची लोकसंख्या १४२ कोटींवर स्थिरावेल. २०४५पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याची आपली योजना आहे, मात्र त्या दिशेने विशेष प्रगती सध्यातरी दिसत नाही. लोकसंख्या अशाच वेगाने वाढत राहिली तर अन्न, पाणी, निवारा, परिवहन, आरोग्य, शिक्षण व रोजगारासह अनेक व्यवस्था उद्ध्वस्त होतील. चीनपेक्षाही भारताची लोकसंख्या वेगाने वाढत असल्याने टक्केवारी घटली तरी गरिबांची लोकसंख्या मात्र वाढत आहे.स्वातंत्र्योत्तर काळात भारताची लोकसंख्या अडीच पटीहून अधिक वाढली.


आज भारतासमोर निर्माण झालेले सर्व प्रश्ने वाढत्या लोकसंख्येनेच निर्माण केलेले आहेत ; मग तो वाढत्या महागाईचा प्रश्न असो , वा बेकारीचा असो , वा वाढत्या शहरीकरणामुळे उत्पन्न झालेला बकाल वस्त्यांचा असो. दुष्काळासारख्या निसर्गाच्या अवकृपेने निर्माण झालेल्या प्रस्नांवर मानवी प्रयत्नातून निश्चितच मार्ग काढता येईल ; पण 'मानवनिर्मित' वाढत्या लोकसंख्येचं काय ?


दशकभरापूर्वी जगाची लोकसंख्या सहा अब्ज होती. सध्या दर सेकंदाला पाच मुलांचा जन्म होत आहे, त्यामुळे दरवर्षी जागतिक लोकसंख्येत ७८ दशलक्षची वाढ होत आहे. ऑक्टोबर अखेरीस जागतिक लोकसंख्या ७ अब्जांचा आकडा गाठेल, असे तज्ञांचे मत आहे. १९६०मध्ये जागतिक लोकसंख्या ३ अब्ज, तर १९९९ मध्ये ६ अब्ज होती. २०२५ मध्ये लोकसंख्येचा आकडा ८ अब्ज असेल.
 
पुढील दशकभरात जगातील गरीब राष्ट्रांची लोकसंख्या दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. वर्षाला ८० दशलक्षांनी लोकसंख्या वाढत आहे. पृथ्वीवरील जलसाठे घटत आहेत, जमिनीची धूप होत आहे, बर्फ वितळत आहे आणि समुदातील माशांचे प्रमाण घटत आहे. भुकेल्यांची संख्या अब्जावधी आहे, अशा परिस्थितीत पावले उचलणे गरजेचे वाटते.
जगातील लोकसंख्या नियंत्रणात आणत आहेत पण भारताने लोकसंख्या नियंत्रणात अत्यत गरजेचे आहेत.
.
 










2 comments:

प्रशांत दा.रेडकर said...

छान लिहिले आहे.

VIVEK TAVATE said...

आभारी आहोत.