महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काकांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. मद्यपान करून वाहन चालविल्याचा आणि वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे मात्र त्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई काही थांबली नाही.
ब्रिटनमध्येही काही वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविताना पकडला गेला होता. त्यालाही अटक करण्यात आली होती.
सत्तेच्या सवोर्च्च स्थानावर असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना गुन्हे माफ करण्याची परंपरा अमेरिका वा ब्रिटनमध्ये नसल्याची ही दोन उदाहरणे.
भारतात अशी कारवाई झाली असती का? आपल्या देशात असली उदाहरणे सापडली का? प्रतिष्टीत व्यक्तीच्या नातेवाईकाना पडक़ण्याचे घाडस कोणताच अधिकारी करु शकत नाही.एखाद्या अधिका-याने नियमावर बोट दाखवत बाणेदारपणा दाखवलाच तर त्याच्यावरच कारवाई होण्याची शक्यता अधिक असते.एखादा अधिकारी आपल्या वरच्या अधिका-याला या गोष्टीची माहीती देउन शांत बसतो.आपल्या देशात प्रतिष्टीत व्यक्तीचे नातेवाईकच त्यांच्या नावाचा फायदा घेतात व कायदे मोडत असतात.या नातेवाईकांच्या कायदे नसतात.कायदे फक्त सामान्याना असतात.अधिकारीही सामान्याना कायद्याचा बडगा दाखवता पण नातेवाईकाना सुट देतात. त्यामुळेच सामान्यांना व 'व्हीआयपीं'ना वेगवेगळी वागणूक दिली जाते.चिड येते या अधिका-याची व मंत्र्याच्या नातेवाईकांची.
त्या देशांप्रमाणेच आपल्याकडेही कायद्याचा खरा सन्मान करण्याची मानसिकता विकसित होण्याची गरज आहे.
असल्या कारवाई करणा-या अधिका-याला प्रथम कामावरुन काढुन टकण्यात आले असते.आतातर आपल्या देशात गुन्हेगाराना कोर्टाने दिलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment