राज्य सरकार अण्णांना झेड सुरक्षा पुरविणार आहे.अण्णांच्या जिवितास धोका पोहचू नये यासाठी केंद्र सरकारच्या सुचनेवरुन महाराष्ट्र सरकारने अण्णासाठी झेड सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा तातडीने निर्णय घेतला आहे.'मी अहिंसेचा पुजारी आहे त्यामुळे असल्या सुरक्षेची मला गरज नाही', अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णांनी ही सुरक्षा नाकारली. ""मला सुरक्षा नको. देशासाठी लढलेले भगतसिंग आणि राजगुरू यांना कुठे होती सुरक्षा ? मी ही देशाचा एक माजी सैनिक आहे. मला कोणाचीच भीती वाटत नाही.सरकारला अण्णांची काळजी आहे तर त्याना १३ दिवस उपोषणास का बसविले?
देशाची सपंत्ती मंत्र्याच्या सुरक्षेवर वाया जात आहे याची जाणीव असल्याने त्यानी सुरक्षा नाकारली आहे.करोडो रुपये या सुरक्षेवर खर्च केला जातो.
परदेशातील मंत्री सामान्यासारखे जीवन जगत असताना त्याना सुरक्षा लागत नाही.परदेशातले मंत्री खुलेआम फिरत असताना दिसतात.सामान्यांशी वार्तालाप करतात.मग आपल्या मंत्र्याना कोणाची भिती आहे? दहशतवाद्यांची?
पण आपल्या देशात ज्याला मोठी सुरक्षा तो मोठा अशी राजकारण्यात एक फँशन आहे.त्यासाठी सरकारची व स्वत्:ची अशी सुरक्षापथकांची कवचकुडंले घेऊन हे मंत्री महोदय वावरत असतात.
ज्याना स्वत:ची सुरक्षा करता येत नाही ते काय सुरक्षा करणार त्याना निवडुन दिलेल्यांची?
अण्णाना समान्यांची भिती नसल्याने त्यानी सुरक्षा नाकारुन एक नवा पायंडा पाडला आहे.ज्याना सामान्यांची भिती आहे त्याना सुरक्षेची गरज आहे.
माझा सरकारशी लढा आहे.मला कोणाची भिती नाही.सरकारला माझी भिती झाली आहे.मला मारले तर सरकार सकंटात येईल म्हणुन ही सुरक्षा. असे मत अण्णांचे आहे.
No comments:
Post a Comment