देशात २0१४मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्या. तरी पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारांच्या नावावरून आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.आगामी निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्यात थेट मुकाबला होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जलद प्रशासन आणि प्रभावी विकासाचे भारतातले सर्वोत्तम राज्य हे गुजरात राज्य आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी वादग्रस्त असले तरी त्यांनी आर्थिक विकासाला राज्यात मार्ग मोकळा करुन दिला. विकासकामांदरम्यान नोकरशाहीचा अडथळा दूर करून भ्रष्टाचार कमी केला. परिणामी देशाच्या आर्थिक विकासात गुजरात भरीव योगदान देत आहे.मोदी यांनी राज्यात अत्याधुनिक रस्ते, वीज क्षेत्रातल्या पायाभूत सुविधेत मोठी गुंतवणूक आणली. परिणामी गुजरातचा वार्षिक विकास दर हा ११ टक्के एवढा झाला आहे.
सरकार कसे चालवायचे हे मोदींकडून शिकायला हवे.कॉंग्रेशनल रिसर्च सर्विस अमीरेकेच्या अहवालात भारताविषयी लिहिलेल्या प्रकरणात ही माहिती देण्यात आली आहे.
राहुल यांनी सर्व काँग्रेस कार्यर्कत्यांचा विश्वास संपादन केला असून त्यांची प्रतिमा अगदी चांगली आहे. यामुळे पक्षातर्फे भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी हेच भावी पंतप्रधान होऊ शकतात अशी कबुली पंतप्रधानानी दिली आहे.
काँग्रेसला गांधी घरण्याशिवाय दुसरे नांव पुढे येऊ शकत नाही.राहुलच्या नांवापुढे 'गांधी'हे नांव नसते तर त्याचे नांव पंतप्रधानांच्या स्पर्धेत आले असते काँग्रेसने राहुलला मोठे केले आहे.
क्मोदीना प्रशासनाचा जेवढा दांडगा अनुभव आहे.तेवढा अनुभव राहुलना आहे का? राहुलजीनी फक्त काँग्रेसचे सरचिटणीस पदावर काम केल्याचा अनुभव आहे.
राजकारणात राहुलने अजुन अनुभव घ्यायला पाहिजे.खुपशा वेळेला नकोत्या वादात पडुन वाद केलेला आहे.राहुल गांधी आता एक जबाबदार व्यक्ती असून त्यांच्यात राजकीय प्रगल्भता आणि परिपक्वताही दिसत नाही.
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफने काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याबद्दल टिप्पणी केली. 'राहुल गांधीही अर्धे भारतीय आणि अर्धे इटालियन आहेत.हा विदेशी व देशीचा वाद केला होता.
मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दहशतवादी हल्ले रोखण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सगळे हल्ले रोखणे कठीण असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानाला हरकत घेत शिवसेनेने काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केलेली आहे. असाही वाद निर्माण झाला होता.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईत युद्ध पुकारले तेव्हा मुंबई परप्रांतियांनी वाचवली, हे उद्गार त्यांनी काढले पाटण्यात, बिहारच्या राजधानीत. हे बोलताना खरे म्हणजे त्यांनी मराठी माणसाचा नव्हे तर देशाचा अपमान केला.राहुल यांना मराठी विरुद्ध अमराठी वादात भाष्य केले होते.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईत युद्ध पुकारले तेव्हा मुंबई परप्रांतियांनी वाचवली, हे उद्गार त्यांनी काढले पाटण्यात, बिहारच्या राजधानीत. हे बोलताना खरे म्हणजे त्यांनी मराठी माणसाचा नव्हे तर देशाचा अपमान केला.राहुल यांना मराठी विरुद्ध अमराठी वादात भाष्य केले होते.
मोदीच्या पाठीमागे त्याच्या कामामुळे ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुढे असल्याने त्याच्यामागे कोर्ट लावले आहेत.यामुळे
त्याना पंतप्रधान पदाच्या मार्गात अड्थळे निर्माण करुन जनतेपुढे त्यांची प्रतिमा मलिन करीत आहेत.
काळानुसार कोण पंतप्रधान होईल ते जनताच ठरवणार आहे.
त्याना पंतप्रधान पदाच्या मार्गात अड्थळे निर्माण करुन जनतेपुढे त्यांची प्रतिमा मलिन करीत आहेत.
काळानुसार कोण पंतप्रधान होईल ते जनताच ठरवणार आहे.
2 comments:
परिस्थिती आपले नायक स्वतः घडवीत असते. तिने विचारणा केल्यस उत्तर दिले जाईल.
Very nice article : AA
Post a Comment