Wednesday, September 21, 2011

महाराष्ट्राची अधोगती राजकारण्यांमुळे

महाराष्ट्रातील राजकारण्याच्या राजकारणामुळे महाराष्ट्राला उपवास घडत आहे.सुविधा,करात सवलती,प्रशासाकिय कामात भ्रष्टाचार नाही,स्वत कामगारांच्या जोरावर व्यवसायाला पूरक वातावरण गुजरात सरकारने  केल्याने देशात गुजरात राज्याने विकास साधला आहे.राजकारणांच्या नाकतेर्पणा मुळे महाराष्टाची पुरी वाट लागली आहे.विकासाचे श्रेय  दुस-याला मिळे नये या घोरणामुळे राज्याचा विकास होत नाही. सर्व पक्षाने या घोरणात बदल केलओ तरच आपल्याला दुस-याला  दोष देण्याची वेळ येणार नाही.

  स्वतंत्र भारताच्या ६० वर्षांच्या इतिहासात गुजरात हेच एकमेव असे राज्य आहे, ज्याने उत्तम प्रशासनाचा धडा घालून दिला आहे.गुजरातने सरकारी कामाची नवी संस्कृती आणली.प्रशासनात जनतेला सामील करून घेतले.उद्योगविश्वाला आकर्षित करण्यासाठी गुजरात सरकार कायम झटत असते.उद्योगाना नव्यानव्या सवलती दिला जात आहेत.


महाराष्ट्र हे उद्योगांच्या पसंतीचे ठिकाण आहे. महाराष्ट्रात फार मोठा औद्योगिक विकास झालेला आहे. परंतु गेल्या काही वर्षात उद्योगांना अन्य राज्यांमध्ये मोठे पर्याय उपलब्ध झाल्याचे दिसून येते. महराष्ट्रात आपल्याकडे उद्योग, विशेष करून छोट्या उद्योगांना विविध परवानग्या, कर यांचा जाच होत असल्याने ते शेजारील राज्यात जात आहेत.

भ्रष्टाचाराबाबत आज महाराष्ट्राची स्थिती वाईट आहे. परवाने, काँट्रॅक्टरकडून घेतली जाणारी टक्केवारी यांचा सुळसुळाट आहे. भविष्याचा कुणीच विचार करताना दिसत नाही. सगळे तुंबड्या भरत आहेत. फायली खालून वर पाठवणार तर प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचार होत आहेत.

महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी राग आहे. राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. लोडशेडिंग आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे जनता त्रस्त झाली आहे.कंपन्या बंद पडत आहेत.कामगार बेकार होत आहेत.राज्यात फक्त इमारती बांधण्याचा विचार राजकारणी करीत आहेत.

महाराष्ट्रात गेल्या काही काळात लोडशेडिंगच्या समस्येमुळे उद्योग त्रस्त आहेत , तसेच अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यात विजेचे दरही जास्त असल्याची उद्योगांची तक्रार आहे उद्योगांचा दर आठ ते नऊ टक्क्यांनी कमी झाल्यास सरकारला दरवर्षी पाचशे ते ७०० कोटी रुपयांचा बोजा पडण्याची शक्यता आहे .

गुजरातमधील औद्योगिक विकास वेगाने होत असल्यामुळे विकास दरही वाढतो आहे . मात्र अजूनही महाराष्ट्रच आघाडीवर आहे . वेळीच पावले उचलली नाहीत तर गुजरात बाजी मारू शकेल .

गुजरातच्या सरकारवर टिका न करता गुजरात सरकारच्या प्रगतीचा अभ्यास करुन आपल्या सरकारने आपल्या विकासाचा अभ्यास करावा.त्रुटी दुर करुन प्रगतीचा आलेख उंचवावा.
 


No comments: