भ्रष्टाचार हा संसर्गरोग आपल्या देशात वेगात पसरत आहे.जगात भ्रष्टाचारात आपला देश मागे आहे.पण त्या भ्रष्टाचारास रोखण्यास अण्णा हजारे यानी आंदोलनानी केला आहे.त्या आंदोलनाला जनतेनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.त्यामुळेच त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी अहिंसक आंदोलनांची स्तुती जगभरातून होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार निवारणासाठी उभारलेला लढा जगाला भावला आहे.
अण्णा हजारे यांनी अहिंसेच्या मार्गाने छेडलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला जगभरातील अनेक बड्या नेत्यांनी सलाम ठोकला असतानाच जगातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती मानले जाणारे जाणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी जनआंदोलन केल्यानंतर अण्णांविषयी आता शेजारी पाकिस्तानातही मोठे आकर्षण निर्माण झाले आहेत. पाकिस्तानात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी अण्णांनी आमच्या देशात येऊन जनतेला मार्गदर्शन करावे अशी गळ पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाचे माजी सर न्यायाधीश नासीर अस्लम जाहिद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घातली आहे.भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील भ्रष्टाचाराचा प्रश्न सारखाच आहे.जगभरातून अण्णाना असाच पाठिंबा मिळत राहिला तर आपल्या सरकारवर दबाव येत राहिल.
आख्खा देश एका बाजूला आणि दुस-या बाजूला लोकांपासून पूर्णपणे एकाकी पडलेले सरकार, असे चित्र निर्माण झाले होते. तेव्हा हतबल झालेल्या सरकारने संसदीय लोकशाहीतील प्रथापरंपरा बाजूला ठेवून शरणागताप्रमाणे आंदोलकांच्या शांतपणे मागण्या मान्य केल्या.कायदा बनविण्याच्या कार्याला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले गेले.
No comments:
Post a Comment