Friday, September 30, 2011

भारतरत्नाची चेष्टा थांबवा.

भारतरत्न हा पुरस्कार खूपच दुमिर्ळ आहे व तो खूपच अलौकिक अशा कार्यासाठी दिला जातो.मागणी करून मिळवण्याइतका 'भारतरत्न' पुरस्कार हलका नाही.

भारतरत्न पुरस्कारच्या मागण्या :


अभिनेते दिलीपकुमार यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांनी मोहिमा उघडल्या होत्या.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती.
पाकविरुद्ध भारताला विजयश्री मिळवून देणारे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी होती.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका असलेल्या गंगूबाई हनगल यांना देशाचा सवोर्च्च बहुमान समजला जाणारा 'भारतरत्न ' किताब मरणोत्तर प्रदान करण्यात यावा.
आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरला भारतरत्न द्या, असा आग्रह सर्वच स्तरावरून होतोय. आता भारताच्या खेळाडूंनी विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याचा आग्रह धरला जात आहे.
बहुमान बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेत्यानी मघ्ये केला होता.
शाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न खिताब देण्यात यावा अशी मागणी एका शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे केली होती.
सावरकरांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना 'मरणोत्तर भारतरत्न' द्यावे, अशी मागणी भाजपने केली होती.
भारतात बुध्दिबळाची क्रेझ निर्माण करणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला भारतरत्न किताब देण्यात यावा.
भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यानाही  भारतरत्न मिळावा अशी हाँकी सघंटना मागणी होत आहे.
समाजसेवक बाबा आमटेंसारख्या कर्मयोग्याला भारतरत्न मिळावे.
लतादीदींनी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली .

भारतरत्नचं काय चाललंय, तेच कळत नाही. अगदी स्वस्त झालंय ते. त्या पदाचीच शान घालवली आहे.भारतरत्नच्या तोडीचे सध्या तरी कुणीही दिसत नाही.

एकतर अनेकांना ते मृत्यूनंतर मिळालंय किंवा मिळाल्यानंतर ते लवकर वारतात,हे मी अगदी बारकाईनं पाहिले. ज्यांना ज्यांना मिळालं ते लवकर स्वर्गवासी झाले.


महर्षी धोंडो केशव कर्वेंपासून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापर्यंतच्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांची व इंदिरा गांधींपासून मदर टेरेसा व बिसमिल्ला खाँसाहेब यांच्यापर्यंत विविध क्षेत्रांत देदिप्यमान कामगिरी बजावणा-यांची  भारत सरकारने 'भारतरत्न' पुरस्कारासाठी निवड केली, तेव्हा भारतीयांनी या निवडींचे उत्साहाने स्वागत केले, याचे कारण ज्यांना हे पुरस्कार मिळाले, त्यांच्याबद्दल भारतीयांना अतीव आदरच वाटत राहिला आहे.

पुरस्काराबद्द्ल निष्कारण वाद निर्माण करण्यात येतो आणि त्यामुळे आता या पुरस्काराची शान व तेज, दोन्ही नष्ट होत आहे.

भारतरत्न पुरस्कारासाठी देशभरातून नावे कायम येत राहतात.भारतरत्न पुरस्कारासाठी सुरू असलेल्या  स्पर्धेने या  पुरस्काराची चेष्टा थांबवावी. 


No comments: