लष्कर-ए-तोयबा आणि बब्बर खालसा या दहशतवादी संघटनांनी रचलेला कट हरयाणा पोलिसांनी उधळवून टाकला याबद्द्ल पोलिसांचे अभिनदंन.या पकडलेल्या स्फोटकांनी जर स्फोट झाले असते तर मोठे नुकसान व मनुष्यहानी झाली असती ती रोखण्यात पोलिसाना यश आले आहे.पोलिसांचेच हे काम आहे तरीपण त्यानी त्यांचे जबाबदारीने काम केले आहे.दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाउन तोंड देण्यासारखेच हेही काम आहे.सर्तकता बाळगल्याने या मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
गेल्या महिन्यात दिल्ली हायकोर्टात झालेल्या स्फोटानंतर दिवाळीच्या दरम्यान पुन्हा राजधानी हादरवण्याचा दहशतवादी संघटनांचा इरादा असल्याने ही स्फोटके वापरण्य़ात येणार होती.हरयाणामार्गे दिल्लीत स्फोटके आणून हा हल्ला घडवण्याचा कट शिजत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली होती. त्यावरून दोन्ही दिल्ली आणि हरयाणा पोलिसांचे पथक वाहनांची कडक तपासणी करत होते. बुधवारी रात्री पोलिसांच्या गस्ती पथकाला अंबाला रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या निळ्या रंगाच्या गाडीबाबत संशय आला. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात पाच किलो आरडीएक्स असल्याचे आढळले. पोलिस तपासाचा संशय आल्याने दहशतवाद्यांनी गाडी तिथेच सोडून पोबारा केला.
गुप्तचर संख्या अशाच प्रकारे सर्तक राहील्यास दहशतवाद्यांचे मनसुबे वाया घालवू शकतात.पोलिसांच्या सर्तकेमुळे हल्ल्यांचे कट उधळून लावल्यास अतिरेकी बिथरल्याने ते नवीन हल्ल्याचे धाडस करु शकणार नाही.पण सर्तकेत आपण कमी व आळ्स केल्यास हल्ल्येखोराना संधी मिळु शकते.त्यानी मग आपलेच नुकसान होत राहणार आणि अतिरेकी वरचढ होऊन ते कायम हल्ले करीत राहणार.
अतिरेकी कारवायाच्या हल्ल्यांचे कट उधळला ही आजची महत्वाची बातमी वृतपत्रातील पहिल्या प्रसिध्द झाली पाहिजे होती.पण या बातमीला वृतपत्रानी महत्व न दिल्याने ती आतल्या पानावर छापली आहे.या पोलिसांना सगळीकडुन शाबासकी मिळाली असे वाटते.स्फोटानतंर पोलिसाना दोष देण्यास जे तयार असतात त्यानी प्रथम त्याना वाहावा करण्यास पुढाकार ध्यावा.या पोलिसानाही पुरस्कार देउन सन्मानीत केले पाहिजे.पोलिसानी अशीच कायम सर्तकता बाळगली तरच आपण सुरक्षित राहु शकतो.
No comments:
Post a Comment